ब्रेकिंग न्यूज
⚡ News18 Marathi Headlines | 16 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Fadnavis |Shinde | NCP| FDA ✦ ⚡ IND vs PAK : 1 बॉल 3 रन… टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर नांग्या ठेचल्या; पाकिस्तानच्या पब्लिकचा रस्त्यावर हा… ✦ ⚡ देवदर्शनासाठी गेलं कुटुंब, घरी कोणीही नसल्याची साधली संधी, नाशिकमध्ये 12 लाखांची चोरी ✦ ⚡ मारेगाव तालुक्यात २ कोटी २२ लाखांच्या विकासकामांचा धडाका! ✦ ⚡ मारेगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष्मीपूजन; नवनिर्वाचित संचालिका किरणताई देरकर यांचा सन्मान ✦ ⚡ IND vs NZ 5th ODI : टीम इंडिया 34-3… न्यूझीलंडमध्ये ROKO चा ‘एन्ड गेम’, ज्याची भीती होती तेच झालं! गंभीरन… ✦ ⚡ Pune Amit Shah: पुणेकरांनो लक्ष द्या! अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार… ✦ ⚡ पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, डाळिंबाच्या बागेत केली वांग्याची शेती, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा,… ✦ ⚡ Karad: बँक मॅनेजरने राहत्या प्लॅटमध्ये संपवलं आयुष्य, ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडात काय घडलं? ✦ ⚡ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, थेट पूलावरून खाली कोसळली गाडी, 21 हून अधिक प्रवासी बसमध्ये
SP News Maregaon

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; मैदान वाचवण्यासाठी नागरिकांचा एल्गार:मैदान हिरावून घेऊ देणार नाही; नागरिक रस्त्यावर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पावरून आता नवीन वाद समोर आला आहे. प्रभादेवी परिसरातील नर्दुल्ला टँक मैदानावर पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे परिसरातील मोकळी जागा कमी होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून मैदान वाचवण्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत नागरिकांच्या बाजूने उभे राहत भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. नर्दुल्ला टँक मैदान हे प्रभादेवी परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. लहान मुलांचे खेळ, ज्येष्ठ नागरिकांची सकाळ-संध्याकाळची फेरफटका, तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी या मैदानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, सिद्धिविनायक कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत येथे पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांची हक्काची मोकळी जागा हिरावली जात असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मैदान वाचवण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराशेजारील परिसरात मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात स्थानिक नागरिकांसह शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. स्थानिक आमदार महेश सावंत, नगरसेवक निशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक नेते या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनीही मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊन मैदान वाचवण्यासाठी आवाज उठवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेत विकासकामांना विरोध नसल्याचे सांगितले आहे. मात्र, सार्वजनिक मैदानांवर अतिक्रमण करून पार्किंगसारखे प्रकल्प राबवले जाणे योग्य नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला आहे. स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या जागांवर अशा प्रकारचे निर्णय घेताना प्रशासनाने नागरिकांचा विचार करणे गरजेचे असल्याचेही आंदोलकांचे म्हणणे आहे. या मुद्द्यावरून प्रभादेवी परिसरात वातावरण चांगलेच तापले असून पुढील काही दिवसांत आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलनाला अधिक राजकीय धार दरम्यान, आमदार महेश सावंत यांनीही या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, आमचा विरोध सिद्धिविनायक कॉरिडॉर प्रकल्पाला नाही. मात्र मैदान काढून घेण्याच्या प्रयत्नाला आम्ही विरोध करत आहोत. शिवसेना असताना हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर आंदोलनाला अधिक राजकीय धार मिळाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता प्रशासन आणि आंदोलक यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर