ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

येळवण येथे 30 गरजू महिलांना आधुनिक शिलाई मशीनचे वितरण:येळवण येथे महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी साेहळा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि सक्षम बनविण्याच्या उद्देशाने अदानी फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आलेल्या शिलाई प्रशिक्षण व शिलाई मशीन वितरण उपक्रमाला येळवण गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यशस्वीरीत्या एका महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३० गरजू महिलांना आधुनिक शिलाई मशीन व शिलाई किटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळण्यास मदत होणार असून त्यांच्या आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग खुला झाला आहे. ग्रामपंचायत येळवण येथे आयोजित या विशेष लोकार्पण सोहळ्याला अदानी फाउंडेशनचे अधिकारी राम बाबू मेरूगुमाला, निखिल आवारे, सोमेश भोसले, जनार्दन कापगाटे, मनीष खेडकर व गणेश पागोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सरपंच काजल दिनेश मडावी, उपसरपंच आम्रपाली अनिल वाहूर वाघ, ग्रामपंचायत सदस्य नंदा कुंबरे, नंदा सोनवणे, वेणूताई चोरपगार, शेषराव शेंद्रे व निरंजन गडलिंग यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी राजेश बापू देशमुख, डी. एम. गडलिंग, नाजूकराव चोरपगार या सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक बचत गटांच्या महिला, ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महिला सक्षमीकरणासाठी अदानी फाउंडेशनने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. या उपक्रमामुळे गावातील महिलांमध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण झाला असून स्वतःचा व्यवसाय उभारण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय वाढसे, किसन चव्हाण व दिनेश मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले, तर प्रभावी सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी गणेश शिरसाठ यांनी केले. गावात आनंदाचे वातावरण आधुनिक शिलाई मशीन आणि संपूर्ण शिलाई किट हाती आल्यानंतर लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर हसू उमलले. स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा निर्धार या महिलांनी व्यक्त केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शाचे पालन करत महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न गावकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर