ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

झरी तालुका पत्रकार संघटना आयोजित ; नृत्य स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी



झरी जामणी दि. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त झरी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने भव्य नृत्य स्पर्धा राजीव विद्यालय झरी च्या पटांगनात उत्साह, जल्लोष आणि रंगतदार वातावरणात पार पडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेला नागरिकांचा, विशेषतः महिला वर्गाचा, मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण परिसर एकप्रकारे सांस्कृतिक उत्सवात रंगून गेला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन आशिषभाऊ खुलसंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रकाशभभाऊ म्याकलवार, राम आईटवार, प्रकाशभाऊ कासावार यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.स्पर्धकांनी सादर केलेल्या विविध नृत्यप्रकारांनी प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणाला जोरदार टाळ्यांचा कडकडाट मिळत होता.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे —
प्रथम क्रमांक : जय कैतवास
द्वितीय क्रमांक : मंगेश चाटाळे
तृतीय क्रमांक : सूरज भरस्कर,संयुक्ता ढवळे,
मिताली पांडे,,लावण्या आगलावे
दिव्या मोहोड,
भाग्यश्री झाडे,
जीविका चौधरी यांना क्रमश: नऊ परितोषिक मिळाले आहे.


स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन अध्यक्ष संजय निंदेकार, उपाध्यक्ष बंडूभाऊ सोयाम, सचिव ज्ञानेश्वर आवारी, निलेश भोयर, विठ्ठल पाईलवर, रमेश अंगलवार, विजय मेंगणवार, नागेश अक्केवार, संजय आकिंनवार, रफिक कनोजे सर्व सदस्यांनी अत्यंत काटेकोरपणे केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मडावी यांनी प्रभावी व रंगतदार शैलीत पार पाडले.सुयोग्य नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि स्पर्धकांचा उत्साह यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर