ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत.

130 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

“शेतकरी महविकास आघाडी पॅनलचा दणदणीत विजय “

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी:-आज दि. ३० एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती झरी जामणी संचालक मंडळाची निवडणूक सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी होत असून ही निवडणूक शेतकरी एकता पॅनल आणि शेतकरी महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे.

ही निवडणूक एकूण १८ जागांसाठी होत असून यात सहकारी संस्था मतदार संघ (सर्वसाधारण ) ७, सहकारी संस्था ( इ मा व) १, सहकारी सहकारी संस्था (अनु. जमाती) १, सहकारी संस्था मतदार संघ (महिला) २, ग्रामपंचायत मतदार संघ (सर्वसाधारण) २, ग्राम पंचायत संघ (अनु. सूची जा./ज)१, ग्रामपंचायत मतदार संघ (आर्थिक दुर्बल) १, व्यापारी अडते मतदार संघ २, हमाल / मापारी / तोलारी मतदार संघ १ असे संचालक निवडून द्यायचे असून, ग्राम पंचायत चे ४१९, सहकारी संस्था – २५१ , व्यापारी अडते ९५ आणि हमाल मापारी १०५ मतदार आहे.

ही निवडणूक ३० एप्रिलला झरी येथील आय. टी. आय. (औद्योगिक प्रशिक्षण केंद्र झरी) येथे सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात आले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती झरी येथे मतमोजणी झाली. ७ वाजे पर्यंत निकाल जाहीर करण्यात आला . या शेतकरी महाविकास आघडीचे १८ पैकी १८ उमेदवार विजयी झाले आहेत . ही निवडणूक विद्यमान आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार आणि माजी आमदार वामनराव कासावार माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी प्रतिष्ठेची केली होती.

*सहकारी संस्था सर्व साधरण मतदार संघातून*

राजू नारायण उपरे , राजीव वामनराव कासावार , प्रशांत करमचंद बघेले , रवि प्रभाकर ढेंगळे , निलेश अरविंद बेलेकार , मंगेश महादेव मोहीतकर ,संतोष रामरेड्डी जंगीलवार ,
*सहकारी संस्था – महिला राखीव मतदार संघातून*
प्रतिक्षा ज्ञानेश्वर पायताडे , मनीचुडा पांडूरंग वैद्य
*सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघातून*
शंकर गोपाळा पाचशाई
*सहकारी संस्था अनुसूचित जमाती मतदार संघातून*
गिरिधर देवराव उइके
*ग्राम पंचायत सर्वसाधारण मतदार संघातून*
दुष्यत गणेश उपरे आणि
हरिदास विठ्ठल झाडे
*ग्रामपंचायत अर्थिक दुष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातून*
सचिन मधुकर टाले
*ग्रामपंचायत अनुसूचित जाती /जमाती मतदारसंघातून*
दयाकर बाजीराव गेडाम
*व्यापारी व आडते मतदारसंघातून*
गंगाधर हनुमंतू बोरकुंटवार
अरविंद विठ्ठल येनघंटीवार
*हमाल व तोलारी मतदार संघातून*
राजू रामलू मंदुलवार
हे विजयी झाले आहेत .
महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले असूनही कार्यकर्त्यांनी जालोश साजर केला .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर