ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

नीट परीक्षेसाठी वायू दलाचा वापर हा मूर्खपणा:हवाई दल राष्ट्रीय सुरक्षेसाठी, भाजपच्या नाकर्तेपणाची भरपाई करण्यासाठी नव्हे – आंबेडकर

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नीट परीक्षेसाठी हवाई दलाचा वापर करण्यास कडाडून विरोध केला आहे. भारतीय हवाई दल हे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अस्तित्वात आहे, ते भाजपचा नाकर्तेपणा व शिक्षण मंत्रालयातील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराची भरपाई करण्यासाठी नव्हे, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने नीट पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट हवाई दलाची मदत घेण्याच्या मुद्यावर गांभिर्याने विचार सुरू केला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावानुसार, हवाई दलाच्या विमनाांचा व त्यांच्या कडक सुरक्षा प्रोटोकॉलचा वापर करून नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका थेट व सुरक्षितपणे वितरित केल्या जाणार आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला जागा उरणार नाही. या प्रस्तावावर अंतिम निर्णय पीएमओच्या मंजुरीनंतर घेतला जाईल. या सर्व प्रक्रियेवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नजर आहे. या पार्श्वभूमीवर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयावर निशाणा साधला आहे. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? प्रकाश आंबेडकर या प्रकरणीची एक बातमी पोस्ट करताना म्हणाले की, हा कसला मूर्खपणा आहे? खरोखरच, हा निव्वळ हास्यास्पद प्रकार आहे. ‘NEET’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक करण्यासाठी हवाई दलाची मदत घ्यावी लागत असेल, तर हे काही भक्कम सुरक्षेचे लक्षण नव्हे; उलट, ही पूर्णपणे कोलमडलेल्या परीक्षा पद्धतीचा जिवंत पुरावा आहे. ‘NEET’ पेपरफुटी केवळ प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणारे ट्रक असुरक्षित आहेत म्हणून होत नाही. तर, या गळतीचे मूळ व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचारात आहे. यात व्यवस्थेतीलच काही लोक सामील आहेत. प्रशासन व संपूर्ण व्यवस्थेमध्येच उत्तरदायित्वाचा (accountability) पूर्ण अभाव आहे, म्हणूनच ही पेपरफुटी होत आहे. ‘NEET’ परीक्षेच्या व्यवस्थापनासाठी हवाई दलाचा वापर करणे हा केवळ मूळ समस्येवरून लक्ष विचलित करण्यासाठी रचलेला एक देखावा आहे. भाजपचे निष्ठावान समर्थक आणि काही विशिष्ट पत्रकार या मूर्खपणाचे किती उत्साहाने समर्थन करतील, याची मी सहज कल्पना करू शकतो. भारतीय हवाई दलाचे अस्तित्व हे देशाच्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आहे. भाजपचा नाकर्तेपणा आणि शिक्षण मंत्रालयाला ग्रासून टाकणाऱ्या खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराची उणीव भरून काढण्यासाठी नव्हे. धर्मेंद्र प्रधान यांना याची लाज वाटली पाहिजे. 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य आणि करिअर धोक्यात घातल्यानंतर राजीनामा देण्याऐवजी, ते जनतेचे लक्ष मूळ समस्येवरून हटवण्यासाठी केवळ अशा मूर्खपणाच्या कृत्यांमध्ये मग्न आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारचे कान टोचताना म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर