बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणाचा निकाल मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात आज जाहीर होणार होता. मात्र, आता या प्रकरणातील आरोपी वैद्यकीय कारणामुळे न्यायालयात हजर राहू शकत नसल्याने निकालाचे वाचन 16 जूनपर्यंत लांबवणीवर पडले आहे. राज्याचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर नऊ आरोपींविरोधातील हा खटला गेली अनेक वर्षे चर्चेत राहिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे केवळ निंबाळकर कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन दशकांपासून सुरू असलेल्या या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रभावशाली नेते पवनराजे निंबाळकर यांची 3 जून 2006 रोजी परंडा-कळंब मार्गावर निर्घृण हत्या करण्यात आली होती. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर यांच्यासह त्यांच्या चालकाचाही मृत्यू झाला होता. दिवसाढवळ्या झालेल्या या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर या प्रकरणाची राजकीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडे होता. मात्र, हत्येमागील कट आणि त्यातील गंभीर आरोप लक्षात घेता हा तपास नंतर केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. राजकीय वादातून ही हत्या घडवून आणण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. तसेच 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा आणि जवळपास 16 महिने हत्येची रेकी व नियोजन सुरू असल्याचा दावा तपासात करण्यात आला होता. सीबीआयने 2009 मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक केली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित होते. गेली अनेक वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू होती. आता अखेर विशेष सीबीआय न्यायालय या प्रकरणावर अंतिम निर्णय देणार आहे. त्यामुळे आरोपींचे भवितव्य, निंबाळकर कुटुंबाला मिळणारा न्याय आणि या गाजलेल्या हत्याकांडाचा शेवट कसा होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. धाराशिवच्या ‘त्या’ दोन भावांची रक्तरंजित गाथा एकेकाळी धाराशिवच्या (तेव्हाचे उस्मानाबाद) राजकारणात ज्यांची जोडगोळी ‘राम-लक्ष्मणा’सारखी मानली जायची, त्याच चुलत भावांच्या नात्याचा शेवट इतका भीषण होईल, याची कल्पना कोणीही केली नव्हती. डॉ. पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील हा प्रवास स्नेह, संशय आणि सूडाच्या वळणावळणाने गेलेला आहे. डॉ. पद्सिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातले सख्य राजकीय महत्त्वकांक्षेतून कट्टर विरोधकांमध्ये बदलले. डॉ. पद्मसिंह पाटील यांचा 2004 च्या विधानसभा निवडणुकीत अगदी निसटता विजय झाला. पुढे मंत्रिपद हुकले. या साऱ्या पार्श्वभूमीवर पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली. अर्थातच संशयाची सुई डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडे वळली. विश्वास ते वर्चस्व: सुरुवातीचा काळ पवनराजे यांना राजकारणाची पहिली पायरी चढवून देणारे त्यांचे मोठे बंधू डॉ. पद्मसिंह पाटीलच होते. त्यांच्यावर पाटलांचा इतका अढळ विश्वास होता की, मुंबईत मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या ‘रिमोट कंट्रोल’ची चावी आणि तेरणा साखर कारखान्याचं सर्वस्व पवनराजेंच्या हाती सोपवलं होतं. मात्र, याच सोपवलेल्या जबाबदारीतून पवनराजेंचे स्वतःचे एक स्वतंत्र वलय निर्माण झाले आणि इथूनच संघर्षाची पहिली ठिणगी पडली. 2004ची निवडणूक: नात्यांच्या चिंधड्या दोघांमधील महत्त्वाकांक्षा इतकी टोकाला गेली की, सख्ख्या भावासारखे राहणारे हे नेते एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू बनले. २००४ च्या निवडणुकीत धाराशिवने रणसंग्राम पाहिला. निवडणुकीच्या दिवशी एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या ‘त्या’ एका संशयास्पद बातमीने (ज्यामध्ये निंबाळकरांनी पाटलांना पाठिंबा दिल्याची अफवा होती) संपूर्ण वातावरण ढवळून काढलं. पाटलांचा विजय झाला खरा, पण त्या विजयाने त्यांची राजकीय चमक ओसरली होती. अल्पमताने मिळालेल्या विजयामुळे त्यांचं मंत्रिपदही गेलं आणि पराभवाचा हा राग मनात घर करून बसला. कळंबोलीचा तो गोळीबार आणि सीबीआयचा प्रवेश 3 जून 2006 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाला काळा डाग लावणारा ठरला. नवी मुंबईच्या कळंबोली परिसरात पवनराजेंची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं. निंबाळकर कुटुंबाच्या आक्रमक पवित्र्यामुळे हा तपास अखेर सीबीआयकडे गेला. तपासाची चक्रे फिरली आणि 2009 मध्ये थेट डॉ. पद्मसिंह पाटील यांना बेड्या ठोकल्या गेल्या. धक्कादायक वळण: अण्णा हजारेंचा उल्लेख या प्रकरणात सर्वात मोठा गौप्यस्फोट झाला तो पारसमल जैन याच्या जबाबामुळे. केवळ पवनराजेच नव्हे, तर भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या अण्णा हजारेंनाही संपवण्यासाठी 30 लाखांची सुपारी दिली गेल्याचा खळबळजनक दावा सीबीआयने न्यायालयात केला. सत्तेच्या हव्यासापोटी एकाच रक्ताच्या दोन भावांमध्ये पडलेली दरी अखेर एकाच्या मृत्यूने आणि दुसऱ्याच्या अटकेने संपली. एका राजानेच आपल्या शिष्याला मोठं केलं आणि पुढे त्याच शिष्याने निर्माण केलेल्या आव्हानामुळे हे ‘कौटुंबिक युद्ध’ इतिहासातील सर्वात चर्चित हत्याकांड ठरलं.
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्येचा फैसला लांबणीवर:पद्मसिंह पाटीलांसह 10 जणांच्या भवितव्याचा निर्णय; 2 दशकांपासून खटला चर्चेत
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
झिशान सिद्दिकींच्या शपथेवरून राजकीय वादंग:इंग्रजीत शपथ म्हणजे...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
अजितदादांची झलक, जयदादांचा जनता दरबार:बारामतीत नागरिकांची मोठी...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
पिंपरी-चिंचवड हादरले!:आरपीआय कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल मोरेंची...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत इंधन वाचवा:मोदींवर जितकी टीका...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांचा शपथविधी:सभापती राम...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
CM फडणवीस बुलेटवरून विधानभवनात:अंबादास दानवे यांचाही पायी...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 14, 2026
