ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:10 लाख साधू, 1000 एकरावर साधुग्राम, नाशिक शहराच्या वेशीवर तब्बल 118 हेक्टर जागेवर पार्किंगचे नियाेजन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून येणाऱ्या भाविक व साधू-महंतांची विक्रमी गर्दी लक्षात घेऊन, प्रशासनाने 2015 च्या तुलनेत यंदा साधुग्रामचा विस्तार तब्बल तिपटीने वाढवण्यात आला असून, 1000 एकर जागेवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त साधुग्राम उभारण्याचे प्रस्तावित आहे. तसेच, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहराच्या वेशीवर तब्बल 118 हेक्टर जागेवर पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. प्रयागराजमध्ये कुंभाला देशभरातून भाविक मोठ्या संख्येने आल्याने आणि नाशिकच्या कुंभमेळ्याचे सरकारकडून मोठ्या प्रमाणात ब्रॅण्डींग सुरू असल्याने यंदा नाशिकमध्ये 5 कोटींहून अधिक भाविक येण्याच्या शक्यतेने तयारी केली जात आहे. यात साधू-महंतांची संख्याही वाढणार असून, पार्किंगचा बोजवारा उडू नये म्हणून प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे. वेशीवरच वाहनांना ब्रेक कुंभमेळ्याच्या काळात शहरात होणारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नऊ प्रमुख मार्गांवरून येणाऱ्या वाहनांसाठी शहराच्या बाहेरच पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाने एकूण 118.66 हेक्टर जागा निश्चित केली आहे. येथून भाविकांना रामकुंड, तपोवन, लक्ष्मीनारायण घाट, राम संगम व दशरथ घाटावर जाणे सोयीचे ठरणार आहे. साधुग्रामच्या सुविधा या साधुग्राममध्ये केवळ मोकळे प्लॉट्स नसून, तिथे अंतर्गत रस्ते, मलवाहिका, जलवाहिनी आणि विद्युतीकरणाचे मोठे जाळे विणले जाईल. याशिवाय भाविकांसाठी निवारा शेड, शॉपिंग सेंटर, पोलीसचौकी, दवाखाने, अग्निशमन शेड आणि सेक्टर ऑफिस उभारले जाणार आहेत. साधुग्राम परिसराचे विशेष सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 50 टक्के टीडीआर नाशिक महापालिकेला साधुग्रामसाठी तपोवन, नांदूर व आगरटाकळीत 784 एकर ते 1000 एकर खासगी जमीन संपादित किंवा अधिग्रहित करायची आहे. जमीन मालकांनी या कायमस्वरूपी भूसंपादनास विरोध केला आहे.महापालिकेने शेतकऱ्यांना 50 टक्के टीडीआर (TDR) आणि 50 टक्के रोख मोबदला देण्याचा प्रस्ताव दिला होता, जो जमीन मालकांनी फेटाळला आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे 100 टक्के रोख मोबदला मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. झाडांचा प्रश्न येऊ शकतो चर्चेत साधुग्रामसाठी तपोवनातील काही झाडे तोडण्यासाठी त्यावर केलेल्या मार्कींगनंतर पर्यावरणप्रेमी संतापले होते. जवळपास महिनाभर विविध पातळ्यांवर आंदोलने झाल्यानंतर झाडे तोडण्याला स्टे मिळाला होता. आता 1000 एकरावर साधुग्राम उभारताना पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत येऊ शकतो. प्रशासन झाडांचा मुद्दा आणि पर्यावरणप्रेमी यांची कशी सांगड घालतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर