ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मनपा निवडणुकीसाठी इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची हत्या:सीसीटीव्हीत तीन संशयित कैद, सोलापुरातील धक्कादायक घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या राजकीय धामधुमीत शहरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असतानाच, लष्कर परिसरात एका इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. अयुब सय्यद असे हत्या झालेल्या उमेदवाराचे नाव असून ते प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, अयुब सय्यद यांची हत्या त्यांच्या राहत्या घरात करण्यात आली. आज दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. सोलापूर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात ही हत्या रात्रीच्या सुमारास धारधार शस्त्राने किंवा गळा आवळून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. संशयित सीसीटीव्हीत कैद पोलिस तपासात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रात्री 11:30 वाजता तीन अनोळखी व्यक्ती अयुब सय्यद यांच्या घरात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यानंतर पहाटे 2:00 वाजता याच तीन व्यक्ती संशयास्पदरीत्या घरातून बाहेर पडून पसार झाल्याचे फुटेजमध्ये कैद झाले आहे. या अज्ञात तिघांनीच अयुब यांची हत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. राजकीय वैमनस्य की सोन्याची लूट? अयुब सय्यद हे केवळ राजकारणातच नव्हे, तर सोशल मीडियावरही अत्यंत सक्रिय होते. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक फॉलोअर्स होते. त्यांनी प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते आणि त्यासंदर्भातील फोटो व व्हिडिओही इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. विशेष म्हणजे, अयुब यांच्या अंगावर नेहमी लाखो रुपयांचे सोने असायचे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही हत्या केवळ राजकीय वादातून झाली की सोन्याच्या लुटीच्या उद्देशाने? या दोन्ही कोनांतून पोलिस तपास करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तणाव १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी अवघे काही दिवस उरले असताना एका उमेदवाराची अशा प्रकारे हत्या होणे, ही पोलिस प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली आहे. लष्कर परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अयुब यांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, संशयित आरोपींच्या अटकेनंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. हे ही वाचा… मंगेश काळोखे हत्या प्रकरण:एकनाथ शिंदेंनी घेतली कुटुंबीयांची भेट, सुनील तटकरे रायगडचा आका म्हणत महेंद्र थोरवेंचे गंभीर आरोप रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता टोकाचा आणि हिंसक वळणावर पोहोचला आहे खोपोली येथील शिवसेनेच्या महिला नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भरचौकात निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर