Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

राज्यात 6 महिने कोणताही मोठा कार्यक्रम नाही:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; जगाच्या तुलनेत केवळ साडेतीन टक्के दरवाढ झाल्याचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यात पुढील 6 महिन्यांपर्यंत कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नसल्याची घोषणा केली. आज जगावर एक मोठे संकट आहे. या संकटाच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यानुसार सरकार पुढील 6 महिने कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणार नाही, असे ते म्हणालेत. सरकारने इतर देशांच्या तुलनेत केवळ साडे 3 टक्क्यांची दरवाढ केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. साताऱ्यात आज प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सरकारने मागच्या 2 वर्षांत 50 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी केले. पण आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही. आमच्या 1 कोटी बहिणी लखपती दीदी होतील. त्या खऱ्या अर्थाने आपल्या अर्थव्यवस्थेचे संचालन करतील. मोदींनी हेच ओळखले. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनची करायची असेल, तर केवळ भावांच्या भरवशावर राहून चालणार नाही. त्यासाठी बहिणींनाच अर्थव्यवस्थेत आणावे लागेल. त्यामुळे बहिणी याकामी उतरल्या तर देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन झाल्याशिवाय राहणार नाही. भारतात केवळ साडे 3 टक्के दरवाढ मुख्यमंत्री म्हणाले, आज जगात मोठे संकट आहे. या संकटाच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. येत्या 6 महिन्यांतील हा आमचा शेवटचा मोठा कार्यक्रम आहे. आता सरकार मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणार नाही. मोदींनी जे सांगितले ते देशहितासाठी सांगत आहेत. आज जगभरात इंधनाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेत 51 टक्के वाढ झाली आहे. तर ब्रिटनमध्ये 22 टक्के, फ्रान्समध्ये 25, जपानमध्ये 35 टक्के, जर्मनीत 27 टक्के, इस्त्रायलमध्ये 30, दक्षिण कोरियात 30 टक्के, इटलीत 30 टक्के, सिंगापूरमध्ये 30, पाकिस्तानसारख्या देशात तर तब्बल 200 टक्के वाढ झाली आहे. याऊलट मोदींनी आपल्या देशात केवळ साडे 3 टक्के दरवाढ केली आहे. त्यांनी एवढे दिवस ही वाढ होऊही दिली नाही. आपण किती त्याग करतो त्यावरच देशभक्ती अवलंबून ज्यावेळी देश संकटात असतो, ज्यावेळी जगावर संकट असते, अशा काळात मोदींनी काही अपेक्षा व्यक्त केल्या, तर आपण आपापल्या परीने त्या अपेक्षांकृत काम करणे ही आपली जबाबदारी आहे. आपण देशभक्त आहोत. देशभक्ती ही अशा परिस्थितीत आपण किती देशासाठी त्याग करू शकतो यावर अवलंबून असते. मोदींनी आपल्याकडून फार मोठा त्याग अपेक्षित केला नाही. याठिकाणी परकीय चलन वाचवण्यासाठी 6 महिने सोन्याची खरेदी करू नका, इंधन वाचवता येईल तेवढा वाचवा, खतांचा निर्बंध वापर करू नका असे ते म्हणालेत. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या आहेत. या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. केवळ 6 महिने हे करायचे आहे. या कालावधीत या जगाची घडी बसली की, या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही. मला विश्वास आहे की, प्रत्येक देशभक्त भारतीय आणि हा महाराष्ट्र तर छत्रपती शिवरायांचा आहे. या महाराष्ट्रपती शिवरायांनी सांगितल्यानंतर आपला जीव देण्यासाठीही आपले मावळे तयार राहत होते. अशा या महाराष्ट्रात आपापल्या परीने जे जे शक्य आहे ते ते आपण करूया, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!