ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

छेडछाडीच्या वादातून सिन्नरमध्ये खुनी हल्ला‎:दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील कानडी मळा परिसरात‎ छेडछाडीच्या कारणावरून दोन गटांमध्ये‎ झालेल्या वादाचे पर्यावसान धारदार ‎शस्त्राने झालेल्या खुनी हल्ल्यात झाले. या‎घटनेत दोन्ही बाजूंचे युवक जखमी झाले‎असून सिन्नर पोलिसांनी दोन्ही गटांच्या‎तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल ‎केले आहेत.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎गोरख विजय सिंग (२४, रा. कानडी‎मळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले‎आहे की, संशयित तेजस ऊर्फ सोनू‎बनसोडे याने त्यांच्या नातेवाईक तरुणी व‎महिलेकडे पाहून शिट्टी वाजवत छेडछाड‎केली. याचा जाब विचारण्यासाठी गोरख‎सिंग व त्यांचा भाऊ विवेक सिंग गेले‎असता, तेजस बनसोडे याने त्याचे‎साथीदार शुभम बनसोडे, प्रथमेश भालेराव,‎सोपान शेळके आणि सिद्धेश मोरे यांना‎बोलावून घेतले. यानंतर सर्वांनी मिळून‎गोरख आणि विवेक यांना लाथाबुक्क्यांनी‎मारहाण केली. दरम्यान, शुभम बनसोडे‎याने गोरख यांचा मावसभाऊ परमवीर सिंग‎याच्या छातीवर व हातावर धारदार शस्त्राने‎वार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात‎ आला आहे. या हल्ल्यात परमवीर सिंग‎गंभीर जखमी झाले.‎ दुसरीकडे, सिद्धेश बालीदास मोरे (२४)‎यांनीही सिन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद‎दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार,‎ते आणि त्यांचा मित्र शुभम बनसोडे हे‎हनुमान मंदिरासमोरील गल्लीतून जात‎असताना परमवीर सिंग, रोहित सिंग आणि‎गौरव सिंग यांनी आमच्या बहिणीकडे‎वाईट नजरेने का पाहतोस? असा जाब‎विचारत वाद घातला.‎ यानंतर शुभम बनसोडे याला मारहाण‎करण्यात आली. भांडण सोडवण्यासाठी‎गेलेल्या सिद्धेश मोरे यांना परमवीर सिंग‎यांनी हातातील धारदार शस्त्राने‎कोपराजवळ वार करून जखमी केल्याचा‎आरोप त्यांच्या फिर्यादीत करण्यात आला‎आहे.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर