ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

अशोक खरातसोबतच्या फोटोवर चाकणकरांचे स्पष्टीकरण:म्हणाल्या – गुरूसोबत देवीचे दर्शन घेता यावे या हेतूने आम्ही गुवाहाटीला गेलो होतो

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा भोंदू अशोक खरातसोबतचा गुवाहाटीतील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. चाकणकरांनी या फोटोवर स्पष्टीकरण देत आपल्याला आपल्या गुरूसोबत देवीचे दर्शन करता आले तर छानच होईल हा अध्यात्मिक भाव ठेवून आम्ही स्वतंत्रपणे पुण्याहून गुवाहाटीला दर्शनासाठी गेलो होतो, असे स्पष्टीकरण दिले आहे. ईडीने गुरुवारी भोंदू अशोक खरात प्रकरणात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची तब्बल 8 तास चौकशी केली. या चौकशीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अशोक खरातच्या कुटुंबासोबतच्या गुवाहाटीतील फोटोवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, अशोक खरातचे कुटुंब अगोदर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर आम्ही कुटुंबासोबत तिकडे गेलो होतो. आपल्या गुरुसोबत दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. अनेकांची श्रद्धा होती. आमचीही होती. गुवाहाटीचा जो फोटो सध्या समोर आला आहे. त्या फोटोमध्ये खरात व माझे कुटुंबीय आहेत. यापूर्वी गुवाहाटीला माझ्या कुटुंबाने देवीचे दर्शन घेतले नव्हते. त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुसोबत देवीचे दर्शन करता आले तर किती छान होईल असा अध्यात्मिक भाव ठेवून आम्ही स्वतंत्रपणे पुण्याहून प्रवास करून गेलो होतो. त्यानंतर गुवाहाटीत आम्ही अशोक खरातसोबत देवीचे दर्शन घेतले होते. अशोक खरातशी आर्थिक संबंध नाहीत रुपाली चाकणकरांनी यावेळी अशोक खरातसोबत आपला कोणताही आर्थिक व्यवहार नसल्याचेही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, तपास यंत्रणांनी मला जेव्हा केव्हा चौकशीला बोलावले, तेव्हा तेव्हा मी आले. शिर्डी पोलिस ठाण्यात माझ्या बहिणीचीही चौकशी झाली. अशोक खरात प्रकरणात आमचा कोणताही संबंध नाही. या प्रकरणी एसआयटीचे प्रश्न वेगळे होते. पोलिसांचे प्रश्न वेगळे होते. समता पतसंस्थेत मी कधीही गेले नव्हते. समता पतसंस्थेत बोगस खाती आहेत. या खात्यांशी किंवा या पतसंस्थेशी माझ्या बहिणीचा कोणताही संबंध नाही. खरातसोबत आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नाही. एसआयटीकडून अशोक खरातची सलग 49 दिवस चौकशी दुसरीकडे, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने अर्थात एसआयटीने अशोक खरातची सलग 49 दिवस चौकशी केली. तसेच 105 जणांचे जबाब नोंदवले. या प्रकरणी अशोक खरातच्या घरासह कार्यालय, फार्म हाऊस आदी विविध ठिकाणी छापेमारी करून अनेक पुरावे जप्त करण्यात आले. यात इलेक्ट्रॉनिक पुराव्यांसह महत्त्वाच्या दस्तऐवजांचा समावेश आहे. याशिवाय साक्षीदारांच्या जबाबातूनही अनेक मह्त्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अशोक खरात हा ईशान्येश्वर मंदिर परिसरात स्वतःकडे दैवीशक्ती असल्याचे भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करत होता. या प्रकरणी त्याने अनेकांची भीती दाखवून, खडे, चिंचुके व रुद्राक्ष देऊन फसवणूक केली. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. त्याने आपल्या अनेक भाविक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचेही समोर आले आहे. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर