ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पाथर्डीतील गोळीबाराची आपबीती सांगताहेत पोलिस अधिकारी:अक्कलकोटमधील सराफ लुटीच्या तपासासाठी पथक‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एआय इमेज अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे एका सराफास लुटून १० लाखांचे दागिने लंपास केले होते. त्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी अटक केलेल्या संशयित आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही गुरुवारी पाथर्डी येथील खरबंडी गावात त्याच्या वस्तीपर्यंत गेलो होतो. रात्री १०.३७ वाजता आरोपीच्या जवळ गेलो. तो पाईपलाईनसाठी चर खोदत असल्याचे दिसून आले. तो गाफील असेल त्यास आम्ही ताब्यात घेऊ असे म्हणून ५ पोलिसांच्या मदतीने त्याच्याजवळ गेलो. त्याने पाहताच प्रश्न केला, ‘कोण तुम्ही?’ आमचे उत्तर ‘पोलिस.’ क्षणाचाही विलंब न करता त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. आम्ही इतर संशयिताना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतानाच गोळीबार करत पावस कचरु गायकवाड पळून गेला. त्यास शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो बीडच्या दिशेने पळून गेला. आम्ही धैर्य सोडले नाही, त्याचा शोध घेत आहोत असे आपबीती सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे सांगत होते. या प्रकरणात एकाला सोलापुरात अटक केली. त्याच्या सांगण्यावरुन मुख्य आरोपी पाथर्डीत आहे, असे समजले. त्यानुसार पावस गायकवाड याला ताब्यात घेण्यासाठी मोहीम आखली होती. पोलिस येत असल्याचे कळू नये म्हणून रात्रीची वेळ निवडली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याच्याजवळ पोहोचलो. पण, ‘पोलिस’ शब्द कानी पडताच त्याने थेट गोळीबार सुरू केला होता. तेथील पोलिस आसाराम बाटुळे यांच्या कानाच्या बाजूने गोळी चाटून गेली. त्यानंतर तो पळून गेला. पळणाऱ्या इतरांना पकडण्यासाठी धावलो. पण कारमधून सर्व जण बीडच्या दिशेने पळून गेले. पिस्तूल चोरीचा असू शकतो पावसने ज्या पिस्तूलमधून गोळी झाडली, ती गोळी पाहता पिस्तूल गावठी कट्टा नाही. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा शस्त्र परवाना नाही. त्यामुळे पिस्तूल चोरीचा असू शकतो. लोडेड पिस्तूल असल्याने तो सराईत गुन्हेगार होता, हे नक्की.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर