ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

स्वयंसेवी वैद्यकीय सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सीएमई क्रेडिट गुण प्रणाली:वैद्यकीय परिषदेकडून पारदर्शक व सर्वसमावेशक निर्णय

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या स्वयंसेवी सेवेचा सन्मान आणि प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) सातत्याने सकारात्मक पावले उचलण्यात येत आहे. याच अनुषंगाने स्वयंसेवी सेवेकरिता CME (Continuing Medical Education) क्रेडिट गुण प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी स्पष्ट व पारदर्शक धोरण राबविण्यात येत आहे. स्वयंसेवी सेवेसाठी सीएमई (CME) क्रेडिट गुण देण्याबाबत सखोल विचार करून परिषदेकडून सध्या अंमलात असलेल्या प्रणालीची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त असलेल्या संघटना, संस्था, अध्यापन संस्था तसेच वैद्यकीय महाविद्यालयांना ठराविक निकष व मार्गदर्शक तत्वांनुसार CME क्रेडिट गुण प्रदान करण्यात येत आहेत. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांचे ज्ञान अद्ययावत राहण्यासोबतच त्यांच्या सामाजिक बांधिलकीलाही चालना मिळत आहे. ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात शस्त्रक्रिया, वैद्यकीय शिबिरे किंवा आरोग्य सेवा देणाऱ्या परंतु अद्याप मान्यता नसलेल्या संस्था, संघटना किंवा रुग्णालयांसाठीही शासनाने स्पष्ट मार्ग खुला करून दिला आहे. अशा संस्थांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून मान्यता (Accreditation) प्राप्त केल्यानंतर त्यांनाही CME क्रेडिट गुण देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे एकीकडे वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेची खात्री राहणार असून, दुसरीकडे स्वयंसेवी आरोग्य उपक्रम अधिक शिस्तबद्ध, उत्तरदायी आणि परिणामकारक ठरणार आहेत. मान्यता प्रक्रियेमुळे वैद्यकीय शिबिरांचे नियोजन, उपचारांची गुणवत्ता आणि रुग्ण सुरक्षेला प्राधान्य मिळणार आहे. ‘सर्वांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा’ या संकल्पनेला बळ महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या या धोरणात्मक निर्णयामुळे राज्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना स्वयंसेवी कार्याकडे अधिक प्रेरणा मिळणार असून, शासनाच्या ‘सर्वांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा’ या संकल्पनेला बळ मिळणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव, कौशल्यवृद्धी आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा समतोल साधणारी ही CME क्रेडिट गुण प्रणाली राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर