ब्रेकिंग न्यूज
मॅट्रिमोनी साईटवर ओळख; लग्नाची स्वप्नं…महिलेला भेटायला फ्रान्समधून पुण्यात आला, पण एअरपोर्टवरच इतकं मोठं … रक्षाबंधनाच्या स्नेहधाग्यातून समाजसेवेचा संकल्प; शिवसेना उबाठाचे वणीतील कौटुंबिक स्नेहमिलन उत्साहात 7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? फक्त 3 सोप्या स्टेप्स वापरून पाहा CRIME : भेटायला बोलवून किडनॅप अन् झाडाला बांधून जिवंत जाळलं; 28 वर्षाच्या इन्स्टाग्राम रीलस्टार तरुणीचा दुर… Navnath Ban Vs Amey Ghole News | नवनाथ बन आणि अमेय घोलेंमध्ये जुंपली | News18 Marathi Anaya Bangar : ऑस्ट्रेलियाकडून संधी मिळताच अनाया बांगरने BCCI वर व्यक्त केली नाराजी! पुरूषाची स्त्री झाली प… अल्पवयीन पोरं, शिकवतो म्हणून मुंबईला आणलं अन् नरकात ढकललं, पैशांसाठी बाप आणि आत्याचं भयानक कृत्य पोलीस बांधवांना राखी बांधून महिला सुरक्षेचा दिला संदेश मराठमोळ्या सचिनच्या घरी ओणमचं सेलिब्रेशन, अख्खं तेंडुलकर कुटुंब जमलं, पण एका गेस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं! भाई का बड्डे! कुख्यात गुन्हेगार तुरुंगात, टोळीचं भयंकर कांड, कारागृहाच्या भिंतीवरच…, Video व्हायरल होताच …
SP News Maregaon

ग्राऊंड रिपोर्ट:कुरनूर धरणावरील वीजपुरवठा केला बंद; पाऊस अन् वीजही नाही, शेतकरी संकटात

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अक्कलकोट पावसाने ओढ दिल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील पाणीसाठा आणि पाणी वापराच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर बोरी मध्यम प्रकल्प तसेच पाटबंधारे तलावावरील कृषीपंपांना विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी होणारा अनियंत्रित वापर रोखण्यासाठी आणि पाणीसाठ्याचे नियोजन सुरळीत ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सुरुवातीला आवश्यक सेवेसाठी पुरवठा पूर्णपणे खंडित करण्याबाबत दोन तास सुरू असलेला विद्युत संबंधित महसूल यंत्रणेशी झालेल्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, चर्चेनंतर पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता दोन तासांचा वीजपुरवठा सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाचा थेट परिणाम अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पाशी संबंधित परिसरावर होणार आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा पत्ता नाही. यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील जलस्त्रोतावरील शेतीसाठी सुरू असलेला पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित क्षेत्रावरील शेती पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा थांबवण्याचा आदेश मिळाल्यानंतर कुरनूर धरणावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही पूर्ण करत पाणीपुरवठा रोखला. यामुळे कुरनूर धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर आता दुहेरी संकट निर्माण झाले आहे. कुरनूर धरणाच्या बॅकवॉटर वर जवळपास ७०० पेक्षा जास्त विद्युत मोटारी सुरू आहेत. यासोबतच ८२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेल्या कुरनूर धरणात सद्यःस्थितीत २२०.६३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी ७८ दलघमी उपयुक्त पातळीत तर १४२ दलघमी पाणीसाठा मृत साठ्यात आहे. सद्यःस्थितीत जवळपास २८ गावांना पाणीपुरवठा सुरू असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियम लावण्यात आलेले नाहीत. पाणीपुरवठा योजनेशी संबंधित असलेला वीजपुरवठा सुरळीत असून धरणातील उपलब्ध पाणी हे पशुधन व नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. ^नागरिकांना टंचाईचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणावरील वीजपुरवठा खंडित केला आहे. लवकरच पाऊस पडेल, ही आशा आहे. नागरिकांनी देखील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. सचिन कल्याणशेट्टी, आमदार. बावकरवाडी, चपळगाव, हन्नूर, बऱ्हाणपूर, नन्हेगाव, पितापूर, चुंगी, कुरनूर आदी भागांमध्ये कृषिपंपांवरील वीजपुरवठा नियंत्रित ठेवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. शेती पाण्याचे नियोजन अधिक काटेकोर राहणार आहे. शेतकरी, ग्रामस्थ आणि संबंधित यंत्रणांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधीक्षकांनी केले आहे. यासोबतच धरणातील पाणी पितापूर, हन्नूर, बावकरवाडी कुरनूर धरण परिसर, कुरनूर, चुंगी या गाव शिवारापर्यंत अजूनही असल्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळत होता. परंतु आता वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या. पुढील आदेश मिळेपर्यंत शेतीसाठी वीजपुरवठा देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाणीसाठा जपणे आणि पशुधनासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध राहणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा पाणीटंचाई शाखेकडून जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्राद्वारे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु पाटबंधारे तलाव आणि बंधाऱ्यावरील शेतीसाठी सुरू असलेला वीजपुरवठा पुढील आदेश मिळेपर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार पत्र मिळताच शुक्रवारी हन्नूर उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कुरनूर धरण परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही पूर्ण केली. चपळगावसह इतरगावात कृषी पंपांना फटका उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर