ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न:साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न, पण साडी फाटल्याने बचावले; बीड येथील घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी शिवसेनेच्या बीड उपतालुकाप्रमुखाने झाडाला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. पण दैव बलवत्तर म्हणून ते ज्या साडीने गळफास घेत होते, ती फाटली आणि ते थोडक्यात बचावले. सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या शिंदे गटाचे बीड उपतालुकाप्रमुख भारत देवकते यांनी बीड लगतच्या म्हसोबा फाटा परिसरात बाभळीच्या झाडाला साडीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या व्हॉट्सएप स्टेटसवर गळ्यात साडी बांधलेला एक फोटो ठेवला होता. सोबत एक चिठ्ठीही ठेवली होती. त्यात त्यांनी आपल्या मृत्यूला ढेकणमोहा गावचे सरपंच पती व ग्रामसेवक जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. भारत देवकते यांनी साडीच्या मदतीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या वजनाने साडी फाटली. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. भारत देवकते यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली. त्यानंतर सर्वांनी म्हसोबा फाट्याकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांना लगेचच लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले आहे. चिठ्ठीत काय केला होता आरोप? भारत देवकते यांनी आपल्या चिठ्ठीत आपल्या मृत्यूसाठी ढेकणमोहा गावचे सरपंची शिवाजी भगवान गाडीवान व ग्रामसेवक बी जी तांदळे हे दोघे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. ते आपल्या चिठ्ठीत म्हणतात, मी गावातील गायगोठा, विहीर, शेततळे यासारखी कामे निःशुल्क दरात करण्याचे ठरवले होते. पण सरपंच पती व ग्रामसेवक यांना ते मान्य नव्हते. त्यांच्या मनमानी कारभारामुळे व सततच्या मानसिक त्रासामुळे मी माझे जीवन संपवत आहे. या दोघांना माझ्या मृत्यूसाठी जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. देवकते यांनी आपल्या मित्रांना आणि शिवसैनिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, या निर्णयासाठी त्यांची पत्नी, मुलगा किंवा कुटुंबातील कोणालाही दोषी धरू नये. तसेच त्यांनी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनाही शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर