ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

दुहेरी हत्याकांडाने कोल्हापूर हादरले:वडिलांच्या डोक्यात दगडाने वार करत घेतला जीव, आईच्या हाताची नस कापत निर्घृण हत्या

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे एकुलत्या एक मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची उघडकीस आले आहे. हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. घराच्या वाटणीच्या वादातून हा भयंकर प्रकार घडला असून हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःहून पोलिस ठाणे गाठत आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेने हुपरी शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजयमाला नारायण भोसले (70) आणि नारायण गणपतराव भोसले (78, रा. महावीर नगर, अल्फालाइन गल्ली, हुपरी) या दाम्पत्याचा जन्मदात्या मुलाने अत्यंत थंड डोक्याने व अत्यंत निर्घृणपणे खून केला आहे. या दुहेरी हत्ये प्रकरणी त्यांचा मुलगा आरोपी सुनील नारायण भोसले (48) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पहाटेच्या सुमारास केली हत्या या घटनेसंदर्भात हुपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील भोसले गेल्या काही महिन्यांपासून घरवाटणीच्या मागणीवरून आई-वडिलांशी सतत वाद घालत होता. तसेच घराच्या वाटणीला आई-वडिलांनी विरोध केला होता. आई वडिलांनी घराची वाटणी नाकारल्याने वैतागलेल्या सुनीलने शुक्रवारी पहाटे साधारण साडेपाचच्या सुमारास आपल्या आई वडिलांची हत्या केली. आईच्या हाताची नस कापली पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, पहाटेच्या सुमारास सुनीलने झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर आधी काठीने वार केला त्यानंतर दगडाने जोरदार प्रहार केला. त्यानंतर खिडकीची काच फोडून त्यांच्या हाताची नस कापली. या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तेवढ्यात घरात प्रवेश करत असलेल्या आई विजयमाला यांच्या डोक्यातही काचेच्या तुकड्याने घाव घातला तसेच आईच्याही हाताची नस कापली. त्यामुळे त्यांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सुनील थंड डोक्याने घराच्या बाहेर आला आणि त्यानंतर त्याने हुपरी पोलिस ठाणे गाठले. इथे त्याने पोलिसांसमोर आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सुनील भोसलेची सखोल चौकशी सुरू पोलिस निरीक्षक एन.आर. चौखंड, सहाय्यक निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक विभागाच्या तज्ञांनी घटनास्थळी पोहोचून ठसे, शस्त्र, रक्ताचे नमुने आणि काचेचे तुकडे व इतर पुरावे संकलित केले. दोघांच्याही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच सुनील भोसलेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून त्याने हत्या नेमकी कशी केली तसेच त्यामागे कोणते कौटुंबिक व सामाजिक कारण होते का, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, भोसले कुटुंब हे येथील परिसरात सर्वसामान्य आणि शांत स्वभावाचे कुटुंब म्हणून ओळखले जात होते. या दाम्पत्याला तीन आपत्ये असून थोरला मुलगा चंद्रकांत आणि संजय हे सराफी व्यवसायात कार्यरत असून दोघेही बाहेरगावी वास्तव्यास आहेत. आरोपी सुनील विवाहित असून त्याला मुलगा आणि मुलगी आहेत. पत्नीशी मतभेद असल्याने गेल्या काही वर्षांपासून तो आई-वडिलांसोबत राहत होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर