ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप;‎सामाजिक बांधिलकीचा उपक्रम‎:बालसंस्कार शिबिराचा उत्साहात झाला समारोप‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी । नांदगाव पेठ श्री रामचंद्र संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालसंस्कार शिबिराची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. शिबिराच्या समारोपानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम स्व.हिराबाई तुळशीरामजी गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टचे विवेक गुल्हाने सप्तरंग एज्युकेशन अॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटी, नांदगाव पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जाणीवा रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिबिरादरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समारोपाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शालेय बॅग मिळाल्याचा आनंद दिसत होता. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत चांगले संस्कार आणि सकारात्मक विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी गरज असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला ट्रस्टचे सचिन राऊत, भास्कर राजूरकर, अतुल तलमले, अक्षय मानकर तसेच सप्तरंग संस्थेचे राजेंद्र तुळे, वेद, अरविंद देशमुख, दिनेश चौधरी, बाळा देशमुख आणि अविनाश शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर