ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

तहसील कार्यालयामध्ये‎प्रगणकांना साहित्य वितरण:तहसीलदार योगेश देशमुख यांनी केले मार्गदर्शन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | यवतमाळ जिल्ह्यात जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्याला शुक्रवार, दि. १६ मेपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली असून प्रगणक घर सूचीकरण आणि माहिती संकलनाच्या कामासाठी मैदानात उतरणार आहेत. या मोहिमेअंतर्गत १६ मे ते १४ जून या कालावधीत शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक घराची नोंद घेण्यात येणार आहे. जनगणनेच्या प्रारंभीच्या तीन दिवसांत इमारतींची गणना करून त्यानुसार परिसरांचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर एचएलओ ॲपच्या माध्यमातून घरांची व नागरिकांची माहिती डिजिटल पद्धतीने संकलित केली जाणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, यवतमाळ येथे प्रगणक व पर्यवेक्षकांना आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी सर्व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करत जनगणना ही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे सांगितले. माहिती संकलन करताना अचूकता, शिस्त आणि नागरिकांशी समन्वय राखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कार्यक्रमाला मंडळाधिकारी एकनाथ बिजवे, नितीन खरोडे, जयंत इसाळकर, प्रीतम गोडे यांच्यासह सर्व पर्यवेक्षक उपस्थित होते. जनगणना मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. नागरिकांनीही प्रगणकांना सहकार्य करून खरी व अचूक माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर