ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

पुण्यात कचऱ्यावरून राजकारण तापले:कचरा साठलेला नाही, तो साठवला गेलाय, पुणे काँग्रेसचा गंभीर आरोप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यात 500 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) ठराविक कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी कचरा व्यवस्थापनात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी याबाबत आरोप केले. ‘भूमी ग्रीन’ या कंपनीलाच निविदा मिळावी यासाठी शहरात कचऱ्याची समस्या कृत्रिमरीत्या निर्माण केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. शहरात कचऱ्याचे ढीग साचू दिले जात असून नागरिकांना वेठीस धरले जात आहे, असे कदम म्हणाले. कदम यांच्या मते, कचऱ्याचा प्रश्न जाणीवपूर्वक तीव्र करून नवीन निविदा प्रक्रियेला गती देण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे शहरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याची टीका त्यांनी केली. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा काँग्रेसतर्फे शहरभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.दरम्यान, या आरोपांवर महापालिका प्रशासन किंवा सत्ताधारी भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ठेकेदारासाठी शहरात साठवला कचरा; कॉंग्रेसचा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, कचरा साठलेला नाही तर कचरा साठवला गेलेला आहे. कचरा माफियाकडून हा प्रकार शहरात केला आहे. एक मोठे पाचशे टनाचे टेंडर मान्य केले जात नाही म्हणून कचरा उचला जात नाही. वादग्रस्त अधिकारी असलेला काटकर यांच्याकडे हा विभाग झोपवण्यात आले आहे. कचरा माफीयाकडून शहराला वेठीस धरले जात आहे. या निविदेच्या माध्यमातून 700 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला जाणार आहे. हे टेंडर मंजूर केले जात नाही म्हणून ही समस्या निर्माण केलेली आहे. कचरा न उचलणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे. महापौरांनी कठोर कारवाई करावी.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर