ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

NCP चे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी:आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार पक्षाध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा दावा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. काही लोक पक्षाविषयी मुद्दाम षडयंत्र रचत आहेत. पण आम्ही सर्वजण सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत, असे ते म्हणालेत. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीतून भाजप जाणाऱ्या 40 लोकांची नावे असल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गत आठवड्या सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे 22 हून अधिक आमदार भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी उपरोक्त दावा केला आहे. तसेच रोहित पवार यांना आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नेमा अशी मागणीही केली आहे. सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी सुनील शेळके सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, आम्ही सर्वच आमदार सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. काही लोक जाणिवपूर्वक षडयंत्र रचत आहेत. मला त्यांना सांगायचे आहे की, सुनेत्रा वहिनींनी पक्षाची धुरा हाती घेऊन केवळ 3 महिन्यांचा कालावधी झाला आहे. आज उपमुख्यमंत्री म्हणून त्या सक्षमपणे पदभार सांभाळत आहेत. अशा कर्तृत्वान महिलेच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहण्याची राहायचे की त्यांना टार्गेट करायचे हे सर्वांनी ठरवावे. या प्रकरणी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्या बैठकीत मी आमदार रोहित पवार यांना आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्याची मागणी मी करणार आहे, असे ते यावेळी उपरोधिकपणे म्हणाले. रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 जणांची नावे – अतुल लोंढे दुसरीकडे, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणाऱ्या 40 जणांची नावे आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याचा दावा केला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमके कोण चालवत आहे? शरद पवार, भाजप, सुनील तटकरे की प्रफुल्ल पटेल? रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे आहेत, जे भाजपमध्ये जाणार आहेत. मी रोहित पवार यांच्या विधानाशी सहमत आहे. जे पी नड्डा यांनी यापूर्वीच देशात विरोधी पक्षच अस्तित्वात राहणार नसल्याचा दावा केला होता. राष्ट्रवादीतील घटनाक्रम हा तो पक्ष फुटण्याची नांदी आहे, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरेंची सभागृहातील उपस्थिती मोदींहून जास्त अतुल लोंढे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सभागृहातील उपस्थितीवरून होणारी टीकाही फेटाळली. या प्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील उपस्थिती किती आहे? त्यांची उपस्थितीही अतिशय कमी आहे. ते केवळ टिंगलटवाळी करण्यासाठी संसदेत येतात. उद्धव ठाकरे यांची सभागृहातील उपस्थिती त्यांच्यापेक्षा जास्त आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर