ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

मंत्र्यांना आदिवासी नागरिकांनी दाखवल्या मेळघाटातील समस्या:डाॅ. उईके यांनी दिले तत्काळ समस्या सोडवण्याचे आश्वासन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मेळघाट दौऱ्याच्या अनुषंगाने चिखलदरा तालुक्यातील तारुबांदा गावास सोमवारी भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या आशेने मंत्र्यांपुढे गावातील गंभीर पाणीटंचाई तसेच खराब झालेल्या रस्त्यांची समस्या मांडत निवेदन सादर केले. तारुबांदा गावात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून, येथील प्रसिद्ध कांदरी बाबा देवस्थानास (क) दर्जा मिळालेला असून, या पवित्र स्थळाच्या सौंदर्यीकरणासह सर्वांगीण विकास व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. देवस्थान परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच डीपीटीसी अंतर्गत निधी उपलब्ध करून भाविकांसाठी सुसज्ज भक्तनिवास उभारण्यात यावे, कांदरी बाबा देवस्थानाच्या विकासामुळे परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्या सोबतच महिलांना व नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी सांगितली. ग्रामस्थांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत उईके यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भेटीदरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मंत्र्यांच्या गाव भेटीमुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभूदास भिलावेकर, मेळघाट विधानसभा क्षेत्राचे आ. केवलराम काळे, सदाशिव खडके, सुधीर रसे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चिखलदरा आणि धारणी हे आदिवासी बहूल तालुके दत्तक घेतलेले आहेत. त्‍यामुळे या भागाच्या विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या मुलभूत समस्या दूर करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने सर्व विभागांशी समन्वय ठेवावा. यामुळेच त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले. या बैठकीत कुपोषण, सिकलसेल, थॅलेसेमिया आणि क्षयरोग या गंभीर विषयांवर स्वतंत्रपणेचर्चा करण्यात आली. आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आणि उपचार सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर