ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

राज ठाकरे मनसे काँग्रेसच्या दावणीला बांधणार नाहीत:संजय राऊत उबाठा शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार का? – नवनाथ बन

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज ठाकरे ‘मनसे’ला काँग्रेसच्या दावणीला बांधणार नाहीत. ते त्यांचा पक्ष उबाठामध्येही विलीन करणार नाहीत, याची कल्पना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आहे. खरे तर संजय राऊतांनी उबाठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रादेशिक पक्ष मजबूत करण्याचा प्रश्न विचारल्यावर राऊत गप्प बसतात, कारण त्यांना माहिती आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे मजबूत होऊ नये, त्यांचा पत्ता कट करण्यासाठी राऊत काँग्रेसची चाकरी करत आहेत. आता संजय राऊत उबाठा शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार का, असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन शुक्रवारी केला. नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी काँग्रेस वाढवण्यासाठी काम करत आहेत की काँग्रेस संपवण्यासाठी मुळात याचे उत्तर संजय राऊत यांनी दिले पाहिजे. आजपर्यंत 99 निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव झाला आहे. काँग्रेस ही नाकर्ते लोकांची पार्टी आहे हे सिद्ध झाले आहे. काँग्रेस हा पक्ष आता वाढणार नाही तर त्यांचे आणखी तुकडे होतील आणि ते वेगवेगळ्या पक्षात विलीन होतील.

जनतेने दुकानाचे शेटर लावले नवनाथ बन म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाढवण्यासाठी काय केले. त्यांचे विचार बाजूला सारत तुम्ही तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की शिवसेनेची काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझे दुकान बंद करेल. उद्धव ठाकरेंनी आपले दुकान बंद करण्याची वेळ होती पण त्यांनी तसे न केल्याने जनतेनेच त्यांचे दुकान बंद केले. मविआच्या दुकानाला शेटर लावण्याचे काम जनतेने केले आहे. राऊत उबाठा काँग्रेसमध्ये विलीन करणार का? नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत काँग्रेस वाढली पाहिजे इतर पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजे अशी भूमिका पोटतिडकीने मांडताना दिसून येत आहेत. उबाठा वाढवण्यासाठी जितका प्रयत्न राऊत करत नाहीत त्यापेक्षा जास्त प्रयत्न ते काँग्रेस वाढवण्यासाठी आणि राहुल गांधी पंतप्रधान व्हावे यासाठी प्रयत्न करतात. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी आपले पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावे असे सांगितले. मग उबाठा गट सुद्धा तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन करणार आहात का? राहुल गांधी यांना काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राऊत जाहीर करणार आहेत का? असा सवाल बन यांनी केला आहे. राऊतांना राहुल गांधींचीच चिंता नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर उबाठाची भूमिका मांडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पण ते राहुल गांधी यांची भूमिका मांडण्याचे काम आणि काँग्रेस वाढवण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे. ते उबाठाचे मीठ खात चाकरी राहुल गांधी यांची करत आहेत. इतर पक्ष संपले तरी चालेल पण काँग्रेस वाढावा ही भूमिका घेत संजस राऊत काम करत आहे. राऊतांनी महाभारताचा अभ्यास केला पाहिजे. कौरवाच्या बाजूने संजय होता, म्हणजे मविआ हे कौरव आहेत. तर महायुती पांडवाच्या भूमिकेत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर