ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष्मीपूजन; नवनिर्वाचित संचालिका किरणताई देरकर यांचा सन्मान ✦ ⚡ IND vs NZ 5th ODI : टीम इंडिया 34-3… न्यूझीलंडमध्ये ROKO चा ‘एन्ड गेम’, ज्याची भीती होती तेच झालं! गंभीरन… ✦ ⚡ Pune Amit Shah: पुणेकरांनो लक्ष द्या! अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार… ✦ ⚡ पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, डाळिंबाच्या बागेत केली वांग्याची शेती, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा,… ✦ ⚡ Karad: बँक मॅनेजरने राहत्या प्लॅटमध्ये संपवलं आयुष्य, ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडात काय घडलं? ✦ ⚡ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, थेट पूलावरून खाली कोसळली गाडी, 21 हून अधिक प्रवासी बसमध्ये ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 13 NOV | 9 AM | Sanjay Shirsat News | NCP Merger | Shiv Sena | Fadnavis ✦ ⚡ अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक करेल मालामाल, मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांनी काय करावं? Video ✦ ⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल…
SP News Maregaon

क्रॉसिंगची कटकट मिटणार,110 किमीचा “सुपरफास्ट’ वेग आता फक्त 16किमी दूर:अकोळनेर-निंबळक हायस्पीड चाचणी यशस्वी; 30 मे रोजी अंतिम चाचणी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अहिल्यानगर-दौंड रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे “सुपरफास्ट’ स्वप्न आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या मार्गावरील गाड्यांचा ११० ते १३० किलोमीटरचा वेग आता अहिल्यानगरपासून अवघा १६ किलोमीटर दूर आहे. अहिल्यानगर-दौंड दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अकोळनेर ते निंबळक या १८.२१ किलोमीटर अंतरावरील पाचव्या टप्प्याची हायस्पीड चाचणी सोमवारी (१८ मे) ताशी १३० किमी वेगाने यशस्वीरीत्या पार पडली. या यशानंतर आता केवळ “विसापूर ते सारोळा’ या १६ किलोमीटर अंतराची अंतिम (सहावी) चाचणी बाकी राहिली आहे. ती पूर्ण होताच विनाकारण रेल्वे थांब्यांची आणि क्रॉसिंगची कटकट कायमची मोडीत निघणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे, विदर्भासह गोवा, कर्नाटक आणि जम्मूकडे जाणाऱ्या गाड्यांचा प्रवास कमालीचा वेगवान होणार आहे. गेल्या ८ वर्षांपासून सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी दुहेरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. यापूर्वी नगर-मनमाड मार्गावरील विविध टप्प्यांच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, एकूण १८४ किलोमीटर दुहेरी रेल्वे लाईन मार्गाची तपासणी पूर्ण झाली आहे. सोमवारच्या चाचणीत ट्रॅकची क्षमता, उर्वरित पान ४ ४ राज्यांना जोडणारा वेगवान कॉरिडोअर! मनमाड-दौंड मार्गावर अहिल्यानगर हे भौगोलिक, व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून येथे एकेरी रेल्वे लाईनची मर्यादा असल्यामुळे गाड्यांचा वेग कमालीचा मर्यादित राहत होता. एखादी गाडी क्रॉसिंगवर असेल. सुपरफास्ट सेवांचा लाभ ^ अकोळनेर ते निंबळक दुहेरी रेल्वे मार्गावर पाचव्या टप्प्याची हायस्पीड चाचणी १०० टक्के यशस्वी झाली आहे. या प्रकल्पामुळे नगरच्या रेल्वे प्रवासात ऐतिहासिक बदल होणार असून, आगामी काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुपरफास्ट सेवांचा लाभ मिळेल. – सागर चौधरी, उपमुख्य अभियंता , रेल्वे विभाग.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर