ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

भगवान शिव हेच सर्व सृष्टीचे मूळ, परमात्म्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे:अधिक मासानिमित्त संत गजानन महाराज मंदिरात भक्तिला उधाण‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भगवान शिव हे सृष्टीचे मूळ आहेत. भगवान परमात्म्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. अंत:काळी भगवानाचे नामस्मरण झाले तरी कुकर्म नष्ट होतात.आयुष्यभर संसारात अडकलेल्या माणसाला अंत:काळी देव आठवणार कसा? असा मार्मिक प्रश्न विचारत स्नेहगंगाश्री आळंदीकर माई यांनी भक्तांना शिवमहिमा सांगितला. नामस्मरणात मोठी ताकद आहे. मुखामध्ये देवाचे नाव घेण्यासाठी पूर्वजन्मीचे पुण्य लागते. ज्यांनी जन्मोजन्मी भजन केले त्यांनाही शेवटच्या क्षणी देव आठवेलच याची खात्री नसते, असेही त्यानी सांगितले. अधिक मासानिमित्त करमाळा शहरातील संत गजानन महाराज मंदिर परिसरात सुरू असलेल्या भव्य शिव महापुराण महाकथेला करमाळा शहरासह तालुकाभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. संत गजानन महाराज मंदिराला बारा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सातदिवसीय आध्यात्मिक पर्वामुळे करमाळा शहर अक्षरशः शिवमय झाले आहे. दि. १५ ते २१ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या शिवमहापुराण महाकथेचे निरूपण सुश्री स्नेहगंगाश्री आळंदीकर यांच्या वाणीतून होत आहे. कथा झांकी, संगीतमय सादरीकरण आणि प्रभावी विवेचनामुळे भाविक भक्तिरसात तल्लीन होत असून, दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. महाकथेच्या पहिल्या दिवशी श्री गणेश कथेचे निरूपण करण्यात आले. कथा झांकीसह संगीतमय पद्धतीने सादर करण्यात आल्याने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या महाकथेचे मुख्य यजमान संगीता खाटेर व श्रेणीक खाटेर यांनी प्रमुख भूमिका बजावली. संत गजानन महाराज मंदिर भक्त परिवाराच्या वतीने रंजना कुरुलकर यांनी कथा व्यासपीठावरील स्नेहगंगाश्री आळंदीकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कथेदरम्यान त्यांनी शिव महापुराणातील विधेश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटीरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायवीय संहिता यांचे महत्त्व स्पष्ट केले. रुद्रसंहितेमधील सती खंड, सृष्टी खंड, पार्वती खंड, कुमार खंड आणि युद्ध खंडातील प्रसंग आगामी दिवसांत कथेतून साकारले जाणार असल्याचे आळंदीकर यांनी सांगितले. शिव महापुराण ग्रंथाची मिरवणूक शिव महापुराण कथेच्या प्रारंभी दि. १५ मे शिव महापुराण ग्रंथाची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा निनाद आणि हर हर महादेवच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर