ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

ठाण्यातील डावखरे कुटुंबात मोठी फूट:भाजप नेते निरंजन डावखरे यांच्या भावाचा राष्ट्रवादीत प्रवेश; तटकरे, वळसे, भुजबळांनी केले स्वागत

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजप नेते निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले. या पक्ष प्रवेशामुळे राजकारणातील एक प्रमुख कुटुंब असणाऱ्या डावखरे कुटुंबात मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून हे कुटुंब राजकीयदृष्ट्या एकजूट होते. पण आज निरंजन डावखरे यांचे बंधू प्रबोध डावखरे यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील व मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रबोध यांनी यावेळी आपण आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना व्यक्त केली. आज माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर ज्या पक्षासाठी कष्ट केले, त्या पक्षात आज मी प्रवेश केला. माझ्या वडिलांनी रुग्णालयात असताना सांगितले होते, ज्यावेळी तुला राजकारणात जावे वाटेल, तेव्हा राष्ट्रवादीत जा. त्यानुसार आज मी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माझ्या वडिलांनी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला. मी त्यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, असे प्रबोध डावखरे म्हणाले. प्रबोध यांना पक्षात चांगली वागणूक मिळेल – भुजबळ छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले, आम्ही पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. वसंत डावखरे अजातशत्रू होते. त्यांच्यात कुठेही शत्रूत्वाची भावना नव्हती. त्यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे यांनी आज आपल्या पक्षात प्रवेश केला. प्रबोध एक उत्तम व्यावसायिक आहेत. त्यांच्या अनेक जिम आहेत. आता ते आपल्यासोबत येत आहेत. त्यांना या पक्षात खूप चांगली वागणूक मिळेल. कुठेही कमी जास्त अशी वागणूक असणार नाही. ते पक्षासाठी मजबुतीने काम करतील. काम करताना काही अडचणी आल्या तर त्या सांगत चला, असे ते म्हणाले. पक्षाची संघटना मजबूत करण्याचे काम करणार दिलीप वळसे पाटील यांनीही यावेळी प्रबोध डावखरे यांचे स्वागत केले. ते म्हणाले, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यातर्फे आम्ही प्रबोध डावखरे यांचे पक्षात स्वागत करतो. प्रबोध एक चांगले व्यावसायिक आहेत. ते राज्याच्या विविध भागांत जवळपास 30 जिम चालवतात. त्यंच्या वडिलांच्या विचारांचा धागा पडकून ते आता पुढे जात आहेत. वसंत डावखरे यांचे हिवरे गाव शिरूर तालुक्यात आहे. तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले होते. विधान परिषदेचे उपसभापती म्हणूनही काम केले. ठाण्यात डावखरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. प्रबोध हे पक्षाची संघटना मजबूत करण्याचे काम करतील.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर