ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे नवे नियम:EVM वरील उमेदवारांच्या नावांचा क्रम बदलला, कशी असणार क्रमवारी?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत उमेदवारांच्या नावांच्या अद्याक्षराप्रमाणे असणारा निवडणूक रिंगणातील क्रम बदलण्यात आला असून, आता राजकीय पक्षांच्या मान्यतेनुसार उमेदवारांची वर्गवारी केली जाणार आहे. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, हे नियम तातडीने लागू करण्यात आले आहेत. पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या आडनावाच्या अद्याक्षरानुसार यादी तयार केली जात असे. यामुळे अनेकदा राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांची नावे यादीत खाली जात असत. मात्र, नव्या सुधारणेनुसार आता पक्षाच्या दर्जानुसार उमेदवारांचा क्रम निश्चित केला जाणार आहे. उमेदवारांची चार गटांत होणार विभागणी नव्या नियमानुसार, ईव्हीएम मशीन आणि मतपत्रिकेवरील उमेदवारांची यादी खालील चार प्रवर्गांमध्ये विभागली जाईल: गट 1: मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार. गट 2: इतर राज्यांतील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार. गट 3: राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेले पण अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार. गट 4: अपक्ष उमेदवार. मतदारांसाठी प्रक्रिया होणार सोपी ग्रामविकास विभागाने पंचायत समिती निवडणूक नियमांमध्ये केलेल्या या सुधारणेमुळे निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि शिस्त येणार आहे. प्रत्येक गटातील उमेदवारांची नावे त्यांच्या त्या-त्या प्रवर्गात अद्याक्षरानुसार लावली जातील, मात्र राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना यादीत पहिले प्राधान्य मिळेल. यामुळे मतदारांना आपल्या आवडीच्या पक्षाचा उमेदवार शोधणे अधिक सोपे होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर