ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

ठाण्यात टायर गोदामाला भीषण आग:धुराचे लोट पाहून नागरिकांची धावपळ; आगीचे कारण अस्पष्ट, जीवितहानी नाही

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ठाणे जिल्ह्यातील मुंब्रालगतच्या शिलफाटा परिसरात आज एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून दूरवरूनही धुराचे प्रचंड लोट दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिलफाटा परिसरातील टायर साठवणूक गोदामात अचानक आग लागली. टायर आणि ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने वेगाने संपूर्ण गोदामाला विळखा घातला. घटनेनंतर परिसरात अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी युद्धपातळीवर बचाव आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. धुराचे दाट लोट आणि उष्णतेमुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र गोदामातील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जयपूरमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग, 3 ठार जयपूरमधील खोह नागोरियान परिसरात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी 11 वाजता भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 5 मजूर गंभीर जखमी झाले. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. जखमींमध्ये समावेश असलेल्या आजीम खान, नासीर खान, समीर खान, बिलाल, अब्दुल वाहिद यांना एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय सूत्रांनुसार, बहुतांश जण 90 टक्क्यांपर्यंत भाजले आहेत. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर