ब्रेकिंग न्यूज
⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान
SP News Maregaon

हिंगोली जिल्ह्यात बोगस किटकनाशकांचा सुळसुळाट:कृषिमंत्री भरणेंच्या प्रतिमेला पैशांचा हार घालून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्ह्यात बोगस खते व किटकनाशकांचा सुळसुळाट झाला असून याकडे कृषी खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी ता. 28 गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या छायाचित्राला पैशांचा हार घालून आंदोलन केले. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस पेस्टिसाइड व कीटकनाशक औषधांची विक्री होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. अनेक कंपन्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व जिल्हा कृषी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बोगस औषधांची विक्री करत असल्याचा आरोप करत, संबंधित कंपन्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रतिमेला पैशांचा हार घालून बोगस कंपन्यांवर कारवाईची मागणी केली. यावेळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, जगदीश बनसोडे, अशोक कावरखे, अमोल एकशिंगे, राहुल कावरखे, अमोल गिरे, प्रविण मते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावे्ळी कावरखे व पतंगे यांनी सांगितले की, जिल्ह्यात सुमारे 90 टक्के कीटकनाशकांची गुणवत्ता संशयास्पद असून, निकृष्ट व बोगस औषधांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही कृषी विभागाकडून दोषी कंपन्यांवर कोणतीही प्रभावी कारवाई केली जात नसल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दम्यान, हिंगोली जिल्ह्यात विक्री होणाऱ्या सर्व संशयित कीटकनाशकांची तात्काळ तपासणी करण्यात यावी. बोगस औषधे विकणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली असून या मागणीसाठी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर