ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

राज्यातील 7500 पैकी 2000 पेट्रोल पंप ड्राय, संभाजीनगरात वाहनांच्या रांगा:पेट्रोल-डिझेलचा महिनाभर पुरेल एवढा साठा- भुजबळ

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमेरिका-इराण युद्धामुळे तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे दर ९० पैसे प्रतिलिटरने वाढवले. यामुळे दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत वाढून ९८.६४ रुपये तर डिझेलची ९०.६७ रुपये झाली आहे. शुक्रवारीच दोन्ही दर प्रत्येकी ३-३ रुपये प्रति लिटरने वाढले होते. फेब्रुवारीत युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत कच्च्या तेलाचे दर ५०% हून अधिक वाढले आहेत. त्यामुळे ताज्या दरवाढीनंतरही तेल कंपन्यांना पेट्रोलवर सुमारे १० रुपये तर डिझेलवर १३ रुपये प्रतिलिटरचा तोटा होत आहे. याचे मोठे कारण होर्मुझ जलमार्ग बंद असणे हे आहे. पेट्रोल पंपांची स्थिती अशी
संभाजीनगर : ३३५ पैकी ५५ ड्राय
अहिल्यानगर : ४०० पैकी २०० ड्राय
नाशिक : ७२५ पैकी ७५ पंप
जळगाव : ३७१ पैकी १५० पंप ड्राय प्रतिनिधी | मुंबई पेट्रोल-डिझेलचे दर आणखी भडकणार अशी भीती व्यक्त होत असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर इंधनाचा साठा करणे सुरू केले आहे. त्याचा परिणाम होऊन राज्यातील सुमारे ७५०० पैकी २००० पेट्रोल पंप ड्राय झाले. ज्या पंपांकडे इंधन आहे तेथून ते खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगावसह अनेक शहरांत वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलिंडरचा महिनाभर पुरेल एवढा साठा आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात इंधनाच्या मागणीत २० टक्क्यांची वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेल सुमारे ३ रुपयांनी महागले. सोमवारी रात्री अशी माहिती पसरली की, आठवडाभरात आणखी दहा रुपयांची दरवाढ होणार आहे. त्यामुळे टाकी फुल करून घेण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या. मंगळवारीही अशीच स्थिती होती. त्यामुळे उपलब्ध स्टॉक संपला. दरम्यान, राज्यात १ ते १५ मे कालावधीत डिझेलच्या मागणीत १९.६६% तर पेट्रोलच्या मागणीत २०.३९% वाढ झाली आहे. संभाजीनगरात इंधनाचे दर
प्रकार जुने दर नवे दर
पेट्रोल ~ 108.56109.22
पॉवर पे. ~ 117.59118.94
डिझेल ~ 95.0195.72 फळे-भाज्या १० ते १५% पर्यंत महागण्याची शक्यता पेट्रोल-डिझेल अजून किती महाग होऊ शकतात? तेल कंपन्यांचे नुकसान ५०% पर्यंत कमी करण्यासाठी किमान १० रुपयांपर्यंत दर वाढवणे आवश्यक आहे. म्हणजेच पुढे ५-६ रुपयांची वाढ शक्य आहे. महागड्या तेलाचा परिणाम? डिझेल हे सर्वाधिक (४०%) वापरले जाणारे इंधन आहे. बार्कलेजचा अहवाल सांगतो की, डिझेल महाग म्हणजेच मालवाहतूक महाग. जूनपासून किरकोळ महागाई दर वाढणे निश्चित आहे. यामुळे फळे-भाज्या १५% महाग होऊ शकतात. पॅकेटबंद दूध, एफएमसीजी उत्पादनांचे दरही वाढवण्याची तयारी आहे. तेलाच्या किमतीतील वाढ विकसित देशांपेक्षा कमी आहे? अमेरिका, ब्रिटन आदी विकसित देशांमध्ये इंधनाचे दर थेट आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाशी जोडलेले आहेत. तिथे २८ फेब्रुवारीनंतर आतापर्यंत पेट्रोल-डिझेल ३५% ते ४५% पर्यंत महागले आहेत. भारतात सध्या दर केवळ ४% वाढले आहेत. तेल कंपन्यांना सध्या किती नुकसान होत आहे?
दोन टप्प्यांत ४ रुपये वाढल्याने तेल कंपन्यांचा तोटा २५% ने कमी झाला आहे. त्यांना आजही दररोज ७५० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर