ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

‘संजय दिना पाटलांच्या कन्येचा एक पाय इकडे, एक पाय तिकडे!:राजुल पाटील यांच्या गैरहजेरीमुळे किशोरी पेडणेकरांचा घणाघात

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेतही जोरदार राजकीय भूकंप आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बुधवारी मुंबई महापालिका सभागृहाच्या बैठकीत खासदार संजय दिना पाटील यांची कन्या आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका राजुल पाटील या अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. यावरूनच मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी राजुल पाटील यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला. गद्दार गेले, संजय दिना पाटील यांच्या कन्येचा एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे आहे. कन्येचे आपण नंतर बघू, असा थेट टोला पेडणेकर यांनी लगावला. बुधवारी मुंबई महापालिका सभागृहात ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर आणि माजी महापौर हरेश्वर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मात्र, सभागृहात चर्चा रंगली ती ठाकरे गटाचे खासदार फुटले अशीच. या बैठकीला ठाकरे गटाचे 65 पैकी 64 नगरसेवक उपस्थित होते. केवळ राजुल पाटील या गैरहजर राहिल्याने त्या नेमक्या कुठे आहेत, यावरून चर्चा रंगू लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव भांडुपमधील घरी राहणेच राजुल पाटील यांनी पसंत केले होते. फुटलेल्या खासदारांमध्ये स्वतः संजय दिना पाटील यांचाही समावेश असल्याने बुधवारी त्यांच्या भांडुप पश्चिमेकडील घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाकरेंना ‘धक्का’ बसणार? 19 जून रोजी शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिवस आहे. या दिवशीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या ‘ऑपरेशन टायगर’साठी निवडलेली तारीख अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यापूर्वी 2022 मध्येही एकनाथ शिंदेंनी याच काळात संघटनात्मक पातळीवर उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का दिला होता. सहा खासदारांचा स्वतंत्र गट; पण दोन स्वाक्षऱ्यांवर प्रश्न? शिंदे गटाच्या संपर्कात गेलेल्या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, ठाकरे गटाचा दावा आहे की लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रावर सहा पैकी दोन खासदारांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. काही आश्वासने पूर्ण न झाल्याने दोन खासदारांनी अंतिम क्षणी पाऊल मागे घेतल्याचा दावा पक्षातील सूत्रांनी केला आहे. त्यामुळे कथित बंडखोर गटाकडे खरंच दोन-तृतीयांश संख्याबळ आहे का, यावरही चर्चा सुरू झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर