ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

‘बिनविरोध’साठी मनसेच्या पदाधिकाऱ्याचा मर्डर:आता ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा दावा होईल, खासदार प्रणिती शिंदे संतापल्या

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. पण आता ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचा दावा केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

सोलापूर महापालिकेसाठी येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची बिनविरोध निवडणुकीसाठी हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहेत. भाजपने प्रथम बाळासाहेब सरवदे यांच्या चुलत भावाच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. पण नंतर त्यांचा पत्ता कट करण्यात आला होता. त्यातून झालेल्या वादातून सरवदे यांची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपने एबी फॉर्म खिडकीतून दिले प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपला सर्वत्र बिनविरोध निवडणुका हव्या होत्या. सोलापुरातील निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) अजूनही उमेदवार याद्या देत नाहीत. भाजपने 100 टक्के एबी फॉर्म हे खिडकीतून दिले आहेत. आम्ही त्याविरोधात कोर्टात दाद मागणार आहोत. अर्ज मागे घेण्यासाठी भाजपने उमेदवारांना अक्षरशः उमेदवार फरफटत नेले. काल याच वादातून मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाली. पण आता ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे सांगण्यात येईल. या प्रकरणी सीसीटीव्ही व इतर साहित्य तपासून या घटनेमागे कोण आहे? हे तपासून पाहिले पाहिजे. सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराना धमक्या येतात. बंडखोर उमेदवारांवरही दबाव टाकला जात आहे. पालकमंत्र्यांनी त्यांच्या स्वतःच्या पदाचा आदर राखला पाहिजे. कारण, ते फारच खालच्या पातळीवर जाऊन निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मर्डर झाला. भाजपकडे उमेदवार नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाही. त्यामुळे ते महाविकास आघाडीचे उमेदवार घेत आहेत. प्रशासनावरील दबाव असेल किंवा माघार घेण्याच्या दिवशी झालेले नाटक असेल त्यातून भाजप पूर्णतः उघडा पडला आहे, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. मविआच्या प्रचाराचा नारळ 5 तारखेला फुटणार महाविकास आघाडीचा सोलापुरातील प्रचार 5 तारखेला सुरू होईल. काँग्रेस इथे हिंमतीने लढा देत आहेत. त्यामुळे इथे आमचाच विजय होईल. याऊलट भाजप इथे रक्तावर राजकारण करत आहेत. भाजपचे लोक केवळ पैसे मिळतात म्हणून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना खोके मिळतात म्हणून ते लढतात. इथे भाजपचे दोन ज्येष्ठ आमदार आहेत. त्यांना पालकमंत्री व मंत्रिपद मिळाले. पण त्यानंतरही त्यांना डावलले जात आहे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, असेही प्रणिती शिंदे यावेळी बोलताना म्हणाल्या. कशी झाली बाळासाहेब सरवदेंची हत्या? दुसरीकडे, बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका व प्रभाग क्रमांक 2 च्या उमेदवारासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप उमेदवार शालन शिंदे व भाजपच्या बंडखोर उमेदवार रेखा सरवदे यांच्या कुटुंबियांत वाद झाला होता. यावेळी शालन शंकर शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी फेकली होती. तर इतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले, असा आरोप मृत बाळासाहेब यांचे बंधू बाजीराव पांडुरंग सरवदे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर