ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

अस्थमा नियंत्रणासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ महत्त्वाचा:भारतात 3.5 कोटी लोकांना दम्याचा त्रास, ‘कंट्रोलर इनहेलर्स’चा नियमित वापर करा- तज्ज्ञ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दमा (अस्थमा) हा केवळ तात्पुरता त्रास नसून, श्वसनमार्गातील सूज (इन्फ्लेमेशन) हे त्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे केवळ खोकला किंवा श्वास लागणे यांसारखी तात्पुरती लक्षणे कमी करण्याऐवजी श्वसनमार्गातील सूज नियंत्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. रुग्णांनी तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन व्यवस्थापनाकडे वळणे अत्यावश्यक असल्याचे मत पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ज्ञ आणि सह्याद्री हॉस्पिटलचे कन्सल्टंट पल्मोनोलॉजिस्ट डॉ. राहुल केंद्रे यांनी सांगितले की, दम्यावर सुरुवातीपासून नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा वारंवार अस्थमाचे अटॅक येणे, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणे आणि रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ शकते. दमा दीर्घकाळ अनियंत्रित राहिल्यास फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. श्वसनमार्गातील सूज कमी करण्यासाठी ‘इन्हेल्ड कॉर्टिकोस्टिरॉईड्स’ हे उपचार प्रभावी ठरतात. केवळ शॉर्ट-अॅक्टिंग बीटा-अॅगोनिस्ट रिलीव्हर इनहेलर्सवर अवलंबून न राहता कंट्रोलर किंवा अँटी-इन्फ्लेमेटरी इनहेलर्सचा नियमित वापर करणे गरजेचे आहे, असे डॉ. केंद्रे यांनी स्पष्ट केले. पुण्यातील श्वास क्लिनिक आणि पुना हॉस्पिटलमधील कन्सल्टंट पल्मोनोलॉजिस्ट डॉ. वृषाली खडके यांनी स्टिरॉईड्सबद्दलच्या भीतीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, “इन्हेल्ड कॉर्टिकोस्टिरॉईड्सबद्दल रुग्णांच्या मनात असलेली भीती पूर्णपणे निराधार आहे. अनियंत्रित दम्यासाठी जेव्हा ओरल स्टिरॉईड्स (गोळ्या) घ्याव्या लागतात, तेव्हा त्यांचा डोस इनहेलरपेक्षा सुमारे एक हजार पट जास्त असतो.” जर रुग्णाला वारंवार रिलीव्हर इनहेलर वापरावे लागत असेल, तर त्याचा दमा नियंत्रणाबाहेर असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत, असेही डॉ. खडके यांनी नमूद केले. भारतात सध्या सुमारे 3.5 कोटी (35 दशलक्ष) लोक दमा या आजाराने ग्रस्त आहेत. ‘लंग इंडिया जर्नल’मधील संशोधनानुसार, सुमारे 90 टक्के रुग्णांना आवश्यक असलेले आयसीएस उपचार मिळत नाहीत किंवा ते वापरले जात नाहीत. यामुळे दम्याच्या व्यवस्थापनात मोठी तफावत दिसून येत आहे. दरम्यान, ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा’ (GINA) च्या 2026 च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फक्त रिलीव्हर उपचारांवर अवलंबून न राहता आयसीएस-आधारित उपचार पद्धतीकडे वळण्यावर भर देण्यात आला आहे. डॉक्टरांनी रुग्णांना नियमित वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने कंट्रोलर इनहेलर्सचा सातत्याने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर