ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक:जयंत पाटलांची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळे म्हणाल्या – त्यांनी त्यांच्या अडचणी मला सांगितल्या

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर अत्यंत महत्त्वाची विधाने केली आहेत. प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया तनपुरेंचे मामा जयंत पाटील यांनी दिली. तर प्राजक्त तनपुरे यांनी भाजप प्रवेशाआधी माझी भेट घेऊन त्यांनी त्यांच्या अडचणी मला सांगितल्या. सगळ्याच अडचणी कॅमेरासमोर सांगायच्या नसतात, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. गत अनेक दिवसांपासून प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी वेळोवेळी आपल्या पक्षाविरोधातही भूमिका घेतली होती. अखेर त्यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे शरद पवार गटाला जोरदार झटका बसला आहे. प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. नेमके काय म्हणाले जयंत पाटील? प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे असल्याने या प्रवेशाचा सर्वात मोठा परिणाम पाटील यांच्यावर झाला आहे. यावर भाष्य करताना त्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत मी देखील ऐकले. मात्र, माझा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. खरं म्हणजे प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश करणे हे आमच्यासाठी धक्कादायक आहे. पण त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती पाहून प्राजक्त तनपुरे यांनी निर्णय घेतला असेल असे मला वाटते”, असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्राजक्त तनपुरेंनी मला अडचण सांगितली – सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर अधिक सूचक आणि मर्मभेदी भाष्य केले. त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि नेत्यांच्या पक्षबदलावर निशाणा साधला. प्राजक्त तनपुरे काल मला मला भेटायला आले होते, त्यांनी त्यांच्या अडचणी मला सांगितल्या. सगळ्याच अडचणी कॅमेरासमोर सांगायचा नससतात, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाची माहिती दिली. तसेच, भाजप नेते म्हणतायत की काँग्रेसमुक्त भारत पण नगरच्या राजकारणाकडे बघा एक राम शिंदे सोडले तर सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच भाजपमधे गेले आहेत. विचारधारा उरलीय का? असा प्रश्न मला पडलाय अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपला टोलाही लगावला. शरद पवार, जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांनी आज सकाळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या भविष्यातील वाटचालीवर भाष्य केले होते. तसेच आपली शरद पवार व मामा जयंत पाटील यांची भेट घेण्याची हिंमत नसल्याचेही स्पष्ट केले होते. ते म्हणाले होते, मी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. पण हा निर्णय घेत असताना माझे मामा जयंत पाटील किंवा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सांगण्याची किंवा त्यांची भेट घेण्याची माझ्यात हिंमत नाही. मतदारसंघातील सध्याच्या अडचणी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर आजवर राजकीय संघर्ष केला, त्यांच्या भावना आणि त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर