ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

मोदींनी बांगलादेशाला हिंदूंच्या हत्येसाठी पैसा दिला का?:संजय राऊत यांचा अर्थसंकल्पीय तरतुदीवर सवाल; RSS वरही साधला निशाणा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खासदार संजय राऊत यांनी मुंबईच्या महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडे यांच्या विधानाचा समाचार घेताना केंद्र सरकार आणि भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर घणाघाती टीका केली आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “ज्या बांगलादेशात हिंदूंची मंदिरे पाडली जात आहेत आणि हिंदूंच्या कतली होत आहेत, त्याच बांगलादेशला मोदी सरकार अर्थसंकल्पातून कोट्यवधींची मदत का देत आहे?” असा जळजळीत सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. मुंबईला बांगलादेशीमुक्त करण्याच्या रितू तावडे यांच्या विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महापौरांनी आधी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली पाहिजे. बांगलादेशात गेल्या काही काळात हिंदूंची ४५० मंदिरे पाडली गेली, हजारो हिंदूंची घरे जाळली गेली आणि सुमारे २३० ते २४० हिंदूंची हत्या झाली. यावर देशाचे पंतप्रधान किंवा गृहमंत्री एक अक्षरही बोलायला तयार नाहीत. उलट, भारताच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या मारेकऱ्यांना काही कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हा पैसा हिंदूंच्या हत्येसाठी दिला आहे का? हे महापौरांनी मोदींना विचारावे.” रितू तावडेंना प्रशासकीय अधिकारांची आठवण मुंबईच्या महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात, त्यांनी शहराच्या विकासावर बोलले पाहिजे, असे सांगत राऊत म्हणाले, “जर महापौर पुन्हा हिंदू-मुस्लिम हाच मुद्दा घेऊन बसणार असतील, तर काल संघाच्या व्यासपीठावर सलमान खानला बोलावून काहीच उपयोग झाला नाही असे म्हणावे लागेल. घुसखोर बांगलादेशींना हाकलायची आमचीही भूमिका आहे, पण त्याचे राजकारण करू नका.” त्या दबावापोटीच भाजपला मराठी महापौर करावा लागला रितू तावडे यांच्या निवडीवर बोलताना राऊतांनी भाजपवर खोचक टीका केली. “मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांची निवड केलेली आहे. या निवडीचे मी स्वागत करतो. भाजपला या निमित्ताने कळले की, मुंबईतला मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे आणि या मराठी माणसानेच देशाच्या स्वातंत्र्याचे आणि हिंदुत्वाचे रक्षण केलेले आहे. शिवसेनेने जो निवडणुकीत प्रचाराची दिशा ठरवली. मराठी माणूस, मराठी अस्मित आणि मराठी जनतेला आम्हाला भरभरून मतदान केले. त्या दबावापोटीच भाजपला मराठी महापौर करावा लागला, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. रितू तावडे या मुळच्या काँग्रेसच्या आहेत. भाजपकडे स्वत:चे ओरिजिनल असे काही नाही,” असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला. संघाच्या कार्यक्रमातील सलमान खानच्या उपस्थितीवरून सवाल काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम झाला. मी पाहत होतो. मलाही आमंत्रण होते, पण मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचे असल्याने मी तिथे गेलो नाही. व्यासपीठावर सलमान खान होते, असे मला कळले. हे सलमान खानचे स्वागत गर्दी जमवायला होते की, संघात यापुढे मुस्लिमांनाही खुले आमंत्रण आहे? हे मोहन भागवतांनी स्पष्ट केले असते, तर योग्य झाले असते. संजय राऊत म्हणाले, ज्या पद्धतीने हिंदू-मुस्लीम असा द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रसार गेल्या काही काळापासून केला जात आहे. त्यामध्ये संघही सामील आहे. कारण मोदी, फडणवीस, अमित शहा किंवा इतर सगळे लो जे हिंदू-मुस्लीम यांचे द्वेषपूर्ण राजकारण करत आहेत, ते सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत. त्यामुळे सलमान खान आमच्या व्यासपीठावर आला हे लोकांना दाखवायला होते का? उद्या सत्ता गेल्यावर हे सगळे लोक तुमच्या व्यासपीठावर येतील का? हा गमतीचा प्रश्न आहे. सलमान खान याला बोलावले याचे स्वागत, पण या देशात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी मुसलमान आहेत. त्यांचेही स्वागत करा, असेही ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर