ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

शिंदे गटाला पश्चाताप झाला असेल तर ‘मातोश्री’वर यावे:सरकारकडून अनेक योजनांमध्ये जनतेची फसवणूक- संजय राऊत

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उबाठाचा पहिल्या क्रमाकांचा शत्रू हा शिंदे गट आहे. याचा अर्थ असा नाही की भाजप काही दानशूर पक्ष आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दोन्ही शिवसेना एकत्र यावे असे मत व्यक्त करत असाल तर आम्ही मातोश्रीवर बसलो आहोत. तुम्हाला पश्चताप झाला असेल तर तो व्यक्त करण्याची जागा ही मातोश्री हे निवासस्थान आहे. ज्या पद्धतीने ते बाहेर पडले त्यासाठी पश्चताप तर करावा लागेल ना? ते मातोश्रीवर आले तर विचार करू, असे अब्दुल सत्तार आणि संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊतांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा हा एक फसवणुकीचा प्रकार असतो. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी ही मागणी आहे. लाडकी बहीण, शेतकरी कर्ज माफीसह अनेक योजनांमध्ये फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होत नसतील तर त्यांनी भाजपला मतदान करू नये. मोदी, फडणवीस यांच्या सभेला शेतकऱ्यांनी जावू नये मग सर्व प्रश्न सुचतील. शिंदे सेना ठेकेदारीच्या पैशांवर उभी संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरला हे चांगलेच आहे. यामुळे नगरसेवकांना आर्थिंक बळ मिळेल. नाशिकमध्ये उमेदवार द्यायचा नाही हा निर्णय उद्धव ठाकरेंशी चर्चा करत झाला. सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण अनेक ठिकाणी निकाल स्पष्ट दिसत आहे. शिंदे सेना हा काही मोठा फोर्स नाही हे सर्व ठेकेदारीच्या पैशातून आलेले आहे. ..म्हणून आम्ही उमेदवार दिला नाही संजय राऊत म्हणाले की, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक आहे. यातील काही जागा सोडल्या तर मविआकडे संख्याबळ जरी नसले तरी जागा बिनविरोध होऊ नये यासाठी मविआने उमेदवार देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार कोकण, पुणे, सातारा,विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी उमेदवार उभे करत आपले अस्तित्व दाखवण्याचा मविआने प्रयत्न केला आहे. नाशिकमध्ये संख्याबळामध्ये मोठा फरक आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी कोणी जास्त इच्छूक नाही. 100 पेक्षा जास्त संख्याबळ असते तर आम्ही उमेदवार देण्याचे धाडस केले असते. ग्रामपंचायतीसाठी विमाने घेऊन फिरणारे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री संजय राऊत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विमाने घेऊन फिरतात. तिथे रणधुमाळी असते विधान परिषदेच्या निवडणुकीत रणधुमाळी नसते. ज्यांच्याकडे संख्याबळ आहे, त्यांचे रणधुमाळी जास्त. नाशिकमध्ये काय होते हे पहावे लागेल. विधान परिषद निवडणुकीमध्ये मी सक्रिय नव्हतो. नाशिकमध्ये आमचा उमेदवार अर्ज दाखल करणार होते पण संपर्कप्रमुखांनी घोडे बाजार होऊ नये म्हणून उमेदवार दिले नाही. भाजप आणि शिंदे असले तिथे घोडेबाजार होतोच. आमच्या नगरसेवकांना काय उद्धव ठाकरे काय भूमिका घ्यायला लावतात हे तुम्हाला लवकरच कळेल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर