ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

शिंदेंचा विधान परिषदेसाठी एक मोहरा ठरला:परभणी – हिंगोलीतून बाजोरियांना देणार संधी; भाजपचा अमरावतीत प्रवीण पोटेंवर विश्वास?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने विधान परिषदेच्या परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विल्पव बाजोरिया यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंबंधी आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी बाजोरिया यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, भाजपकडून अमरावतीत प्रवीण पोटे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष अंग झटकून कामाला लागलेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेने परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विल्पव बाजोरिया यांचे नाव फायनल केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विल्पव यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विल्पव बाजोरिया यांनी महायुतीमधील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. मुलगा परभणी हिंगोली, वडील अमरावतीसाठी आग्रही विल्पव यांनी कालच आपले वडील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. विल्पव हे मूळचे अकोल्याचे आहेत. त्यांनी यापूर्वीही परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे विल्पव यांचे वडील गोपीकिशन बाजोरिया यांनी स्वतःसाठी भाजपच्या ताब्यात असलेल्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा केला आहे. यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. अमरावती मतदारसंघातील काँग्रेस नगरसेवकांचाही आपल्याला मोठा पाठिंबा मिळणार असल्याचा दावा त्यांनी या प्रकरणी केला आहे. गोपीकिशन बाजोरिया यांनी यापूर्वी अकोला – वाशिम – बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे सलत 3 वेळा प्रतिनिधित्व केले होते. भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी 2022 च्या निवडणुकीत गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव केला होता. त्यावेळी बाजोरिया पितापुत्र एकाचवेळी विधान परिषदेत होते. अमरावतीच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार? मागील 2 वर्षांपासून रिक्त असलेल्या अमरावतीच्या जागेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अमरावती विधान परिषद मतदारसंघाचा कार्यकाळ जून 2024 मध्ये संपला होता. या मतदारसंघातून भाजपचे प्रवीण पोटे – पाटील यांनी 2021-24 या कालावधीत सलग प्रतिनिधित्व केले. यामुळेही यंदाही त्यांनाच उमेदवारी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या बाजूने काँग्रेसकडून अनिल अग्रवाल यांचे नाव पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची अमरावती महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील एका नामांकित वृत्तपत्राचे संपादक व मालक म्हणून त्यांची ओळख असून, त्यांनी मागील काही वर्षांपासून विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू ठेवली आहे. यामुळे अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे-पाटील आणि काँग्रेसचे अनिल अग्रवाल यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्याच्या जागेसाठी भाजप – राष्ट्रवादीत रस्सीखेच दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीत पुण्याच्या जागेवरून भाजप – राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पुणे विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीचे अनिल भोसेल निवडून आले होते. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच मिळावी असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीतर्फे पुणे जिल्ह्यात भाजपपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा असल्याचा दाखलाही दिला जात आहे. विशेषतः यावेळी पिंपरी चिंचवड येथील एखाद्या पदाधिकाऱ्याला आमदारकीची संधी द्यावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली जात आहे. राष्ट्रवादीतर्फे या ठिकाणी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, नाना काटे, अजित गव्हाणे व भाऊसाहेब भोईर हे इच्छुक आहेत. यापैकी कोणत्याही एका नेत्याला संधी दिली जावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीची 348, तर भाजपची 319 मते आहेत. शिंदे गटाच्या 68 मतांची यात भर पडणास असल्यामुळे दगाफटका न झाल्यास येथून महायुतीचा उमेदवार निवडून येणे सहज शक्य आहे. यामुळेच या जागेसाठी राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांनी चांगलाच जोर लावला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर