ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

मोहटे पाझर तलावाची थांबणार गळती:पाथर्डीतील 150 हेक्टर शेतीचा प्रश्न मार्गी, 50 लाखांचा निधी मंजूर‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पाथर्डी तालुक्यातील जुने मोहटे येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, यामुळे परिसरातील सुमारे १५० हेक्टर शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. आमदार मोनिका राजळे यांनी या कामासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. १९७२ च्या भीषण दुष्काळात या पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या तलावातून प्रसिद्ध श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान आणि रेणुका विद्यालयाला पाइपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तलावाच्या भिंतीला मोठी गळती लागल्याने पावसाळ्यातील पाणी उन्हाळ्यापर्यंत टिकत नव्हते. त्यामुळे परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत होती. सध्या तलावाच्या भिंतीवरील झाडे-झुडपे काढून अत्याधुनिक पद्धतीने प्लास्टिक अंथरण्याचे काम सुरू आहे. यानंतर मातीचा भराव व दगडी पिचिंग (दगडी अस्तरीकरण) करून गळती पूर्णपणे रोखली जाईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. पाणी वर्षभर टिकणार ^ जुने मोहटे तलावाचे अस्तरीकरण केल्यामुळे तलावाची होणारी गळती थांबणार आहे. यापूर्वी पावसाळ्यात तलावात पाणी आल्यानंतर गळतीचे प्रमाण मोठे होते.त्यामुळे पाणी टिकत नव्हते. मात्र,आता तलावातील गाळ देखील मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला आहे.तसेच तलावाचे अस्तरीकरण करण्यात आल्यामुळे पाण्याची होणारी गळती थांबणार आहे. त्यामुळे पाणी वर्षभर टिकेल याचा फायदा माझ्यासह परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. पाणी वर्षभर टिकले तर पिकेदेखील वेगवेगळे घेता येतील. – माणिक दहिफळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार गेल्या वीस दिवसांपासून हे काम अहोरात्र सुरू आहे. तलाव दुरुस्तीमुळे पाणी साठवण क्षमता वाढेल आणि उन्हाळ्यातील टंचाई दूर होईल. आमदारांनी ५० लाखांचा निधी देऊन मोहटादेवी परिसराचा पिण्याचा आणि शेतीचा प्रश्न सोडवला आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्ते शिवाजी दहिफळे यांनी दिली. शेती उत्पन्नात होणार वाढ ^ तलावातील गाळ काढल्यामुळे तलावाच्या पाण्याच्या साठवण क्षमतेत वाढ होणार आहे.याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार असून शेती उत्पादनात देखील वाढ होणार आहे.तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास देखील मदत होणार आहे. – शिवाजी दहिफळे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर