ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

माता सीतेच्या गोष्टीमध्ये रमले अहिल्यानगरचे रसिक:अनुभव संपन्न, कसदार वाचिक अभिनयातून उलगडले सीतेच्या जगण्याचे भावविश्व‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रामायणातील सीतेच्या जगण्याचे भावविश्व आणि तिच्या वाट्याला आलेला संघर्ष, सुप्रसिद्ध लेखिका डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या कसदार वाचिक अभिनयातून उलगडत गेला आणि नगरकर रसिक त्यात पूर्णपणे रमून गेले. निमित्त होते, अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’चे. या व्याख्यानमालेचे चौथे आणि अखेरचे पुष्प डॉ. कुलकर्णी यांनी गुंफले. वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांनी सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे लिखित “सीतेची गोष्ट’ या कथेचे बहारदार अभिवाचन केले. या प्रसंगी व्यासपीठावर वाचनालयाचे सहकार्यवाह डॉ. राजा ठाकूर, संचालिका शिल्पा रसाळ, ज्योती कुलकर्णी, राहुल तांबोळी आणि ग्रंथपाल अमोल इथापे उपस्थित होते. डॉ. वंदना कुलकर्णी यांच्या संवादातील चढ-उतार आणि प्रभावी वाचिक अभिनयामुळे सीतेच्या आयुष्यातील विविध प्रसंग रसिकांच्या डोळ्यांसमोर जिवंत झाले. लव-कुशाची माता, रामाची पत्नी, भरत-लक्ष्मणाची वहिनी आणि दाई वसूमाईची कन्या अशा विविध रूपांतील सीतेच्या नात्यांना त्यांनी आपल्या सादरीकरणातून न्याय दिला. वाल्मिकी रामायणात नसलेले अनेक सूक्ष्म संदर्भ “सीतेची गोष्ट’ या कथेतून समोर येतात. ज्या शिवधनुष्याचा घोडा करून ती लहानपणी खेळली, तेच धनुष्य पुढे रामाने मोडले; हा विरोधाभास कथेमध्ये अत्यंत तरलतेने मांडला आहे. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. राजा ठाकूर यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय शिल्पा रसाळ यांनी करून दिला. आभार ज्योती कुलकर्णी यांनी मानले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल, वर्षा जोशी, संकेत फाटक, आर्यन मडुर व संजय गाडेकर यांनी परिश्रम घेतले. लेखिकेची प्रचंड प्रतिभाशक्ती “सीता हे पात्र त्रेतायुगातील असले, तरी डॉ. अरुणा ढेरे यांनी ही कथा २१ व्या शतका सुसंगत अशी लिहिली आहे. लेखिकेची प्रतिभाशक्ती आणि कल्पकता यांमुळे रामायणातील सीतेचे प्रगल्भ रूप आजच्या पिढीलाही तितकेच भावते. जे आपण स्वतः प्रस्थापित केले, त्याचे विसर्जन आपणच केले पाहिजे, हा मोलाचा विचार ही कथा देऊन जाते,” असे डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर