ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण …

8 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री उशिरा अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुरू असतानाच शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी ११ वाजता संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. गेल्या बैठकीत ठरल्यानुसार पंतप्रधानांनी ही वेळ दिली असल्याचे समजते. ‘जेन झी’ (Gen Z) आंदोलनानंतर निर्माण झालेल्या देशभरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी एनडीएच्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी टप्प्याटप्प्याने चर्चा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थितीची माहिती घेण्यासाठी शिंदेंना पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे.
‘ऑपरेशन टायगर’नंतर बैठक…
नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेतील (UBT) ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या खासदारांसह शिवसेनेच्या प्रतिनिधींनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता थेट पंतप्रधानांसोबत ही बैठक होत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा?
या बैठकीत खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांवर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. या विस्तारात शिवसेना शिंदे गटाला दोन मंत्रिपदे मिळू शकतात. या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात खलबते होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर