ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपलाय:यापुढे कुठलीही चर्चा होणार नाही, शरद पवार गटाच्या बैठकीनंतर शशिकांत शिंदेंचे मोठे विधान

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मात्र आमदार रोहित पवार यांनी पाथ फिरवल्याचे पाहायला मिळाले. शरद पवारांनी अजित पवार गटातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची काही दिवसांपूर्वी स्तुती केली होती, त्यामुळे रोहित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यात त्यांनी या बैठकीला दांडी मारल्याने नाराजीच्या चर्चेला उधाण आले आहे. तर पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी बैठकीबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. शशिकांत शिंदे म्हणाले, फार मोठ्या उमेदीने पक्ष पुढे नेण्यासाठी सर्वांचा सहभाग असावा, त्यात खासदार असतील, आमदार असतील, ज्यांनी निवडणुका लढवल्या आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सगळ्यांनी वेळ देऊन पक्षात पूर्णपणे महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही उभा करण्याच्या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार तसेच खासदारांनी आपापली भूमिका मांडली आहे. तसेच हे आधी स्पष्ट करती की विलीनीकरणाचा हा विषय संपलेला आहे. यापुढे विलीनीकरणाबाबत कुठलीही चर्चा होणार नाही. आम्ही सक्षमपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्ष म्हणून हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे एक नेता म्हणून जो चेहरा आहे, तो घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाणार आहोत. रोहित पवारांची खंत आम्ही दूर करू आमदार रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना खंत व्यक्त केली होती की आमच्या पक्षातील नेते काम करत नाहीत, यावर प्रश्न विचारला असता शशिकांत शिंदे म्हणाले, आज मी तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी माध्यमांच्या बाहेर काय सांगितले आहे ते मला माहीत नाही. पण मी एक सांगतो आम्ही पक्षाच्या शिस्तीतून आम्ही व्यवस्थित एकत्र काम करू. त्यांच्या काही खंत असतील त्या मी दूर करून भविशेत आक्रमकपणे आंदोलन करणार आहोत. आम्ही एक शिबिर देखील आयोजित करणार आहोत. आज नीट परीक्षेचा प्रश्न आहे, इंधन दरवाढ आहे, महागाई आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून पक्ष मजबूत करण्यात येणार आहे आणि पक्षाच्या चौकटीमधूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. 15 ऑगस्टनंतर राज्यव्यापी दौरे शशिकांत शिंदे म्हणाले, 15 ऑगस्ट नंतर आम्ही संयुक्तपणे कॉंग्रेस असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी आम्ही महाराष्ट्रात राज्यव्यापी दौरे करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात संघटन मजबूत करणार आहोत. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही उतरणार आहोत. कार्यकर्ता आहे तिथे आहे, जनता आमच्या पाठीशी आहे. जनतेच्या माध्यमातून उठाव करून सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर