ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जामखेडमध्ये टोळीयुद्धाचा भडका:कुख्यात गुंड सागर मोहळकरवर गोळीबार, 4 गोळ्या लागल्याने प्रकृती चिंताजनक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील नुरानी कॉलनी परिसरात बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास कुख्यात गुंड सागर किसन मोहळकर याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात मोहळकरला 4 गोळ्या लागल्या असून, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला तातडीने पुण्याला हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर मोहळकर बुधवारी सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास नुरानी कॉलनी रस्त्यावरून जात होता. यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी एकूण 5 ते 6 राऊंड फायर केले. गोळ्या लागताच मोहळकर रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची पळापळ झाली. या गोंधळाचा फायदा घेत हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. सागर मोहळकर हा जामखेडमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रकृती खालावल्याने पुण्याच्या रुग्णालयात घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी मोहळकरला तातडीने जामखेडमधील खासगी रुग्णालयात व त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने गुरुवारी सकाळी त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या शरीरात चार गोळ्या अडकल्या आहेत. मोहळकर रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर मोहळकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो काही काळ नाशिक कारागृहात होता आणि महिनाभरापूर्वीच जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याच्या सुटकेनंतर शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात होती. या गोळीबारामुळे गुन्हेगारी वर्तुळातील जुना वाद पुन्हा चिघळल्याचे बोलले जात आहे. नुरानी कॉलनी परिसरात कडेकोट बंदोबस्त घटनेनंतर पोलिसांनी नुरानी कॉलनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून नाकेबंदी करण्यात आली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. सध्या शहरातील परिस्थिती तणावपूर्ण शांततेची असून पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर