ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

धर्मांतर बंदी कायद्यावर सरकार ठाम:मंत्रालय हा कट रचण्याचा अड्डा नाही, जरांगेंनी चुकीचं विधान करु नये- पंकज भोयर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य सरकार लवकरच राज्यात ‘धर्मांतर बंदी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मंत्री पंकज भोयर यांनी दिले आहेत. बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला जात असून, कोणाचेही नुकसान करण्याचा यात हेतू नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यासोबतच मदरशांमध्ये चालणाऱ्या कामाची पडताळणी करून पुढील निर्णय घेतले जातील, असेही ते म्हणाले. पंकज भोयर म्हणाले की, मंत्रालय हे कुणाच्याविरोधात कट रचण्याचे ठिकाण नसून येथून जनतेला न्याय देण्याचे काम, सर्वसामान्य लोकांकरिता चांगल्या शासकीय राबवण्याचे काम होत असते.मनोज जरांगे पाटील यांनी कुठलेही चुकीचे स्टेंटमेट मंत्रालयाबद्दल करू नये. ..तर परवाना कायमचा रद्द पंकज भोयर म्हणाले की, राज्यात डान्सबारला परवानगी देण्यात येत नाही, केवळ ऑकेस्ट्रा बारला परवानगी देण्यात येते. काही ठिकाणी ऑकेस्ट्रा बार या नियमांचे उल्लघन करतात त्यावेळी काही दिवसांसाठी आपण त्यांचा परवाना काही दिवसांसाठी सस्पेंड करत असतो. पण यापुढे वारंवार जर असे करताना कोणात ऑकेस्ट्रा बार आढळला तर त्यांचा परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय आपण घेत आहोत. आरटीइचा बॅकलॉग भरण्याचा प्रयत्न पंकज भोयर म्हणाले की, इतिहासामध्ये आरटीइच्या(RTE)च्या पैशांचा मोठा बॅकलॉग होता, परंतु मागच्या 5 ते 6 वर्षांमध्ये त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. आता काही जास्त बॅकलॉग राहिलेला नाही. पण या कारणास्तव शाळेंना अल्पसंख्यांक दर्जा मिळवणे हे देखील उचित नाही. समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रवेश मिळणे न्यायक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने काही प्रकार कुणी करू नये. वडेट्टीवारांकडून शेतकऱ्यांचा अपमान पंकज भोयर म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांनी सभागृहासमोर खोटी माहिती ठेवली, 9 लोकांचे किडनी डोनर-रिसिव्हर हा प्रकार घडला, त्यांच्यामध्ये दोन जण महाराष्ट्रातील होते त्यातील दुर्दैवाने एक जण शेतकरी होता. परंतू वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करण्याचे काम विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या म्हणत केला आहे. कुठल्याही शेतकऱ्यांनी त्यांचा किडन्या विकल्या नाही, वडेट्टीवारांनी राज्यातील शेतकऱ्यांना अपमान केला आहे, तो करु नये. तर पदमश्री मान्यवरांचा देखील अपमान त्यांनी करु नये. सिंधुदुर्ग प्रकरणी कारवाई होणार पंकज भोयर म्हणाले की, सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये एका मदरशामध्ये दोन लहान मुलांना त्या ठिकाणी शिकवणाऱ्या शिक्षकाने मारहाण होताना दिसते आहे. या संदर्भात सिंधुदुर्ग पोलिसांना सूचना दिल्या आहेत की त्या व्हिडिओची सतत्या कितपत आहे. नेमका तो व्हिडिओ कुठला आहे, यावर चौकशी सुरू आहे त्यानंतर कारवाई करण्यात येईल. अजूनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही पण लवकरच कारवाई करू.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर