ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

प्लास्टिक जप्ती, डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम:17 हजाराचा दंड वसूल, अमरावतीत पालिकेची इतवारा बाजार परिसरात मोहीम‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहराला प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ बनवण्यासाठी महानगरपालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. महानगरपालिका उत्तर झोन क्र. १ रामपुरी कॅम्प आणि मध्य झोन क्र. २ राजापेठ अंतर्गत येणाऱ्या मोची गल्ली परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतवारा परिसरातील २२ आस्थापनांची तपासणी करून त्यांच्याकडून एकूण १२ हजार रुपयांचा त्याचप्रमाणे मोची गल्लीतून ५ हजार रु.दंड वसूल झाला. अशाप्रकारे एकूण १७ हजार रु. दंड वसुलीची कारवाई करण्यात आली. ​वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक जप्ती पथकाने बाजारपेठेत कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान पवन किराणा या दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेले प्लास्टिक आढळून आल्याने त्यांच्यावर थेट ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ​स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून दुकानात डस्टबिन (कचराकुंडी) न ठेवणाऱ्या ७ व्यापाऱ्यांवर प्रत्येकी १,००० रुपयांप्रमाणे एकूण ७,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ​व्यंकटेश तेल भंडार, ​प्रवीण साहू, ​जय बजरंग स्वीट मार्ट, ​राजु नमकीन, ​शिवाणी स्वीट मार्ट, ​पटेरिया स्वीट मार्ट, ​हेमराज साहू इत्यादी दुकानांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिका मध्य झोन क्र. २ राजापेठ अंतर्गत येणाऱ्या मोची गल्ली परिसरात मंगळवार १९ मे रोजी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी साहिल ट्रेडर्स या आस्थापनाला तब्बल ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.‘स्वच्छ शहर-सुंदर शहर’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्लास्टिकमुक्त परिसर निर्मितीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ​या मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक राजू डीक्याव, प्लास्टिक स्वास्थ निरीक्षक सचिन सैनी यांच्यासह स्वास्थ निरीक्षक मेघराज ढेनवाल, निखिल खंगाळे, एम. सैय्यद, शाहू जवंजाळ, अनिकेत महल्ले आणि आशिष सहारे यांनी सहभाग घेतला. शहरात येणाऱ्या प्लास्टिकला रोखणे गरजेचे या विशेष मोहिमेदरम्यान पथकाने मोची गल्ली परिसरातील एकूण १८ व्यापारी आस्थापनांची अचानक भेट देऊन कसून तपासणी केली. सुदैवाने, तपासणी दरम्यान अनेक व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती दिसून आली. अनेक ठिकाणी कापडी व कागदी पिशव्यांचा, तसेच शासनाने परवानगी दिलेल्या ५१ मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचा वापर होत आहे. व्यापाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे शहरातील स्वच्छता राखण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील ही मोहीम यापुढेही अशीच सातत्याने सुरू राहणार आहे. सर्व व्यापारी बांधवांनी स्वतःहून पुढाकार घेऊन शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर