ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

महामंडळांना आमदारांनी बळकटी द्यावी:‘चौथा स्तंभ’ मजबूत करण्यासाठी पत्रकार, विक्रेत्यांचे साकडे, निर्णयाकडे लागले लक्ष‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. संघाच्या शिष्टमंडळाने चांदूर-धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड यांची भेट घेत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी शासनाने घोषित केलेल्या महामंडळांना बळकटी देण्याची मागणी केली आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार व संबंधित कर्मचारी तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदनही यावेळी सादर केले. या भेटीत आमदार प्रताप अडसड यांनी पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्याय्य मागण्या प्राधान्याने सोडवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत राहण्यासाठी पत्रकारांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या कल्याणासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीचे स्वतंत्र पत्रकार महामंडळ व वृत्तपत्र विक्रेता महामंडळ बळकट करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या क्षेत्रातील सर्व घटकांना संस्थात्मक आधार मिळावा, अशी संघाची भूमिका आहे. १९९६ पासून जनसामान्यांच्या सेवेसोबत पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या संघटनेच्या शिष्टमंडळात राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने, राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, सुरेश सवळे, राष्ट्रीय कैलासबापू देशमुख, राजेंद्र भुरे, राष्ट्रीय चिटणीस अशोक पवार, प्रदीप जोशी, रवींद्र मेंढे, महिला मंच प्रदेशाध्यक्ष कांचन मुरके, सागर सवळे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे, संतोष वाघमारे आदी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर