ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

सत्तेची वाट:पाच निवडणुका लढले, दोन वेळा ठाकरे ब्रँडवर लोकसभेत; आता शिंदेंच्या वाटेवर

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असताना त्यांच्या गेल्या १६ वर्षांच्या राजकीय प्रवासाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे. विशेष म्हणजे, वाकचौरे यांनी आतापर्यंत पाच निवडणुका लढवल्या, त्यातील दोन्ही संसदीय विजय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या छत्राखालीच मिळवले. आता ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत राजकीय नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. वाकचौरे यांनी २००९ मध्ये अविभाजित शिवसेनेच्या तिकिटावर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत ३ लाख ५९ हजार ९२१ मते मिळवून विजय संपादन केला. या निवडणुकीत ते जायंट किलर ठरले, त्यांनी रामदास आठवले यांचा पराभव करत संपूर्ण राज्याचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले. त्यानंतर २०२४ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (ठाकरे गट) तिकिटावर लढताना त्यांनी तब्बल ४ लाख ७६ हजार ९०० मते मिळवत दुसऱ्यांदा लोकसभेची वाट धरली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील ही सर्वाधिक मतसंख्या ठरली. याउलट ठाकरे यांच्या उर्वरित पान ४ खा. वाकचौरे यांचा राजकीय प्रवास { शिवसेना (२००९) { काँग्रेस (२०१४) { भाजप (२०१४) { अपक्ष (२०१९) { शिवसेना (ठाकरे गट) (२०२४) { शिवसेना (शिंदे गट) वाटचाल (२०२६) डिपॉझिट जप्त झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंकडून टिकीट २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या भाऊसाहेब वाकचौरेंना अवघी ३५ हजार ५२६ मते मिळाली होती. मतांची टक्केवारी कमी राहिल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. एकेकाळी लाखो मतांचा जनाधार असलेल्या नेत्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला गेला होता. मात्र, या पराभवानंतरही उद्धव ठाकरे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर विश्वास दाखवत शिर्डी मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि वाकचौरेंना तब्बल ४ लाख ७६ हजार ९०० मते मिळाली व दुसऱ्यांदा ते संसदेत पोहोचले. विशेष म्हणजे, २०१९ च्या तुलनेत त्यांच्या मतांमध्ये तब्बल ४ लाख ४१ हजार ३७४ मतांची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर