ब्रेकिंग न्यूज
⚡ औंढा नागनाथ मंदिर एक महिना बंद राहणार, भाविकांना 5 ऑक्टोबरपासून दर्शन नाही, कारण… ✦ ⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन…
SP News Maregaon

धोकादायक ठिकाणी रंबलर स्ट्रिप्स, वेगरोधक पट्टे लावणार:नगर-कल्याण महामार्गावर अपघातानंतर 2 महामार्गांवर 8 ब्लॅक स्पॉट्सवर उपाययोजना‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे-नाशिक आणि कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा पोलिसांनी झिरो फेटल अॅक्सिडेंट’ मोहिमेला सुरुवात केली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दोन्ही महामार्गांवरील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. महामार्गांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणामुळे वाहनांचा वेग वाढला असून, गंभीर अपघात होत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक विभाग आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीतून दोन्ही महामार्गांवरील ८ धोकादायक ‘ब्लॅक स्पॉट्स’ निश्चित करण्यात आले आहेत. पोलिसांनी संबंधित कंत्राटदारांना पुढील ७ दिवसांत सर्व अपघातप्रवण ठिकाणी रबलर स्ट्रिप्स, वेगरोधक पट्टे आणि रिफ्लेक्टर्स लावण्याचे कडक आदेश दिले आहेत. तसेच महिनाअखेरपर्यंत रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. पाहणीत प्रामुख्याने ८ ठिकाणे सर्वाधिक धोकादायक कल्याण-अहिल्यानगर हायवे: पेमदरा ते राजुरी दरम्यानचे ४ पॉईंट्स (येथे अतिवेग आणि चुकीच्या ओव्हरटेकिंगमुळे अपघात वाढले आहेत). पुणे-नाशिक हायवे: चाळकवाडी टोलनाका परिसर, लंबोदर हॉटेलसमोरील तीव्र वळण, फाउंटन हॉटेलजवळील धोकादायक भाग आणि पिंपळवंडी फाटा. गावाकडे वळणारी वाहने आणि वेगवान ट्रॅफिकमुळे हे भाग अपघातप्रवण बनले आहेत. अपघातांची चिंताजनक आकडेवारी गेल्या काही वर्षांत या भागात झालेल्या अपघातांची मालिका मृत्यूचे कारण ठरत आहे: . वर्ष २०२४: तब्बल ३२ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू. . वर्ष २०२५ : २० प्राणघातक अपघातांची नोंद. . वर्ष २०२६ : गुंजाळवाडी येथील भीषण एसटी बस अपघातासह आतापर्यंत ६ गंभीर अपघातांची नोंद झाली आहे. ही वाढती मृत्यूची मालिका थांबवण्यासाठी पोलिसांनी आता थेट कृती आराखडा तयार केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर