ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’अभियान सुरू:पंचगव्हाण येथे विविध आजारांची तपासणी, दंत, नेत्र आणि ईसीजी तपासणीसह नागरिकांना मोफत आरोग्य कवच‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यभरात ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत अकोला जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात विविध उपक्रमांना उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून नुकतेच प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचगव्हाण येथे भव्य आरोग्य व दंत तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या या शिबिरामध्ये पंचगव्हाण आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुविधा मिळावी, हा या शिबिरामागचा मुख्य उद्देश होता. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गट प्रवर्तक किरण बावस्कर, आरोग्य सहाय्यक साहेबराव रावणकर, आरोग्य सेविका गायकवाड, आरोग्य सेवक, गावातील सर्व आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. या मोफत आरोग्य शिबिरामुळे परिसरातील गरीब व गरजू रुग्णांची मोठी सोय झाली आहे. ग्रामस्थांनी आरोग्य विभागाचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले आहे. अत्याधुनिक सेवांचा लाभ विशेष शिबिरामध्ये नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने दंत चिकित्सा: दातांचे विविध आजार, हिरड्यांच्या समस्या आणि त्यावरील मोफत उपचार करण्यात आले. तसेच दृष्टिदोष तपासणी करुन मोफत आरोग्य सल्ला देण्यात आला. तसेच हृदयरोगाची तपासणी करण्यात आली. यासाठी आवश्यक रुग्णांची मोफत ई.सी.जी. तपासणी करण्यात आली. तसेच रक्तदाब, मधुमेह आणि इतर प्राथमिक आजारांचे निदान करण्यात आले आणि मोफत ओषधे देण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर