ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

हिंगोलीत राजकीय भुकंप:माजी समाजकल्याण सभापती मुनीर पटेलांचा शिंदेसेनेत प्रवेश, वसमत, औंढा तालुक्यात पक्षाला बळ मिळणार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेस, राष्ट्रवादी पुन्हा काँग्रेस अन राष्ट्रवादी असा राजकिय प्रवास करीत माजी समाज कल्याण सभापती मुनीर पटेल यांनी अखेर शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. गुरुवारी ता. 21 मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदेसेनेला वसमत व औंढा नागनाथ तालुक्यात बळ मिळणार आहे. हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती मुनीर पटेल हे राजकिय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. हिंगोली जिल्हा परिषदेत समाज कल्याण सभापती असतांना त्यांनी गरजूंना योजनांचा लाभ मिळवून दिला. या शिवाय चुकीच्या प्रश्‍नावर जिल्हा प्रशासनाला धारेवर धरण्याचे कामही त्यांनी केले. दरम्यान, काँग्रेस पक्षानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र राष्ट्रवादीत त्यांचे जास्त काळ मन रमलेच नाही. त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. हि जबाबदारीही त्यांनी पार पाडली. त्यांनी पुुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मागील काही दिवसांपासून ते राजकिय क्षेत्रापासून बाजूला झाले होते. त्यांचा जनसंपर्क व नागरीकांचे प्रश्‍न सोडविण्याची हातोटी लक्षात घेऊन शिंदेसेनेने त्यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न चालविले होते. त्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार बांगर यांच्यासह शिंदेसेनेचे वसमत तालुकाध्यक्ष राजू चापके, युवा जिल्हा प्रमुख राम कदम, नगरसेवक गुड्डू बांगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मुनीर पटेल यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे वसमत व औंढा नागनाथ तालुक्यात पक्षाला मोठे बळ मिळणार असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला चांगलाच फायदा होणार असल्याचे राजकिय वर्तुळातून बोलले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर