ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

शरद पवार गटाचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात- धर्मरावबाबा आत्राम:आमचा एकही खासदार फुटणार नाही,आत्रामांच्या दाव्यावर धैर्यशील मोहिते पाटलांचे प्रत्युत्तर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. शरद पवार गटाचे 5 खासदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. ‘आम्ही कोणतेही ऑपरेशन करणार नाही, तर तुतारीवाले स्वतःहून विकासासोबत येतील,’ असा टोलाही त्यांनी लगावला. धर्मरावबाबा आत्राम माध्यमांशी बोलताना म्हणाले की, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघातील कामे करण्यासाठी सत्तेसोबत आणि विकासासोबत राहणे गरजेचे असते. त्यामुळे शरद पवार गटाचे 5 खासदार येत्या 12 डिसेंबरपर्यंत आमच्या पक्षात प्रवेश करू शकतात. काँग्रेसच्या खासदारांना पक्षात आणण्याची सध्या कोणतीही चर्चा नाही, कारण त्यासाठी वेगळे ‘ऑपरेशन’ करावे लागेल. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास असून अनेक माजी खासदार आणि आमदार पक्षात येत असल्याने आमची ताकद वाढत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. अमित शहा यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यानच शरद पवार गटाच्या खासदारांना सोबत घेण्याबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्यामुळे आत्राम यांच्या दाव्याला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचे चोख प्रत्युत्तर दुसरीकडे, शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आत्राम यांचा दावा फेटाळून लावला आहे. इतर पक्षांमध्ये काय चालले आहे यावर मी बोलणार नाही, पण आमच्या पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो, असा विश्वास मोहिते पाटील यांनी व्यक्त केला. खासदार फुटणार असल्याचे वक्तव्य तथ्यहीन- देशमुख शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख म्हणाले की, पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार फुटणार असल्याचे तथ्यहीन वक्तव्य डुप्लिकेट राष्ट्रवादीचे नेते बाबा आत्राम यांनी केले आहे. हे वक्तव्य पूर्णतः निराधार आहे. बाबा आत्राम यांची मुलगी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आहे. आत्राम यांनी आधी आपल्या मुलीला तुतारीतून फोडून दाखवावे आणि मग आमदार खासदार फोडण्याच्या वार्ता कराव्या असे म्हणत अनिल देशमुखांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
हे ही वृत्त वाचा अशा नेत्यांमुळेच वीट आला असावा- कृष्णा पाटील आष्टीकर ठाकरे गटातून बंडखोरी करत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आष्टीकर यांच्यावर केलेल्या अत्यंत तिखट टीकेला आता त्यांचे सुपुत्र आणि विधान परिषदेचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “मी आजही उद्धव ठाकरेंसोबतच खंबीरपणे उभा असून, माझ्या कुटुंबावर चिखलफेक करणाऱ्या सुषमा अंधारेंना उत्तर देण्यास मी अजिबात बांधील नाही,” अशा स्पष्ट शब्दांत कृष्णा आष्टीकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर