ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

साकोरा येथील ग्रामसभेत पाणीटंचाई निवारणासाठी नवीन विहिरीचा ठराव:जलजीवन योजनेतील अपयशावर चर्चा आणि वृक्षलागवड करण्याचा संकल्प‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गेल्या काही वर्षांपासून जलजीवन योजनेतून पाणीपुरवठा न झाल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर साकोरा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन सार्वजनिक विहीर घेण्याचा ठराव, ग्रामपालिकेच्या मालमत्तांची फेरआकारणी करून उत्पन्न वाढवण्याचा निर्णय तसेच संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे प्रशासक अतुल बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामविकास अधिकारी उमेश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभा पार पडली. सभेत गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. गावात मागील तीन वर्षांपासून सुमारे पाच कोटी रुपये खर्च करूनही जलजीवन योजनेचे पाणी मिळत नसल्याची बाब ग्रामसभेत गंभीरपणे मांडण्यात आली. या योजनेची ठोस हमी नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरवर्षी जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या उद्भव विहिरीजवळ एप्रिल-मे महिन्यात मन्याड नदीत बुडकीसाठी मोठा खर्च केला जात होता. या पार्श्वभूमीवर यावर्षी नवीन सार्वजनिक विहीर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभेत आगामी ‘एल् निनो’च्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. तसेच गाव पर्यावरणपूरक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचा संकल्पही करण्यात आला. सभेच्या सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक धोंडिराम पठाडे यांनी आगामी जनगणनेविषयी ग्रामस्थांना माहिती देत अचूक माहिती देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. साकोरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात विविध प्रश्नांसदर्भात सभा पार पडली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थ. आज पी.एम. जनमन कॅम्प केंद्र व राज्य शासनाच्या ‘पी.एम. जनमन’ (सबसे दूर, सबसे पहिले) मोहिमेअंतर्गत शुक्रवारी (दि. २२) सकाळी १० वाजता साकोरा येथे विशेष लाभार्थी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील कातकरी समाजातील पात्र व वंचित लाभार्थ्यांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक अतुल बोरसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर